माझ्या नोकरीतील शेवटच्या एल टी सी साठी मी राजस्थान ची निवड केली . भारंभार प्रेक्षणिय स्थळ न निवडता. जयपूर , रणथंबोर, अजमेर जवळील पुष्कर सरोवर, अजमेर शरीफ दरगाह, जोधपूर आणि उदयपूर असा दौरा होता. 4 नोव्हे ते 11 नोव्हे 2019. जातांना येतांना फ्लाईट असल्याने वेळेची बचत झाली आणि प्रत्यक्ष साईट सिईंगला वेळ देता आला. तुम्हाला वाटेल कि आता ह्या ट्रीपचे वर्णन या ब्लाॅग मधे असणार काय? नाही बिल्कुल नाही कारण साईट सिईंग म्हटल कि मला पु ल देशपांडेंनी केलेले वर्णन आठवतं. म्हणून तसल काही करणार नाही. पण मला राजस्थान मध्ये काही वेगळं आढळलं ते सांगणार आहे. राजस्थान मध्ये किल्ल्यांचा रखरखाव पहाण्यासारखा आहे. तिथे किल्याचा काही भाग सरकारने व्यवसायिक उपयोगासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. जसे हॅडी क्राफ्ट , राजस्थानी पेहराव , कारिगरी चे स्टाॅल इ. या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्याचा उपयोग किल्ले संवर्धनासाठी केला जातो. त्यामुळे किल्ले सुस्थितीत आहेत. आपल्या इथे असे काही करायला हवे. असे मला वाटून गेले. पर्यंटनाला वाहिलेले लोक आहेत. आम्ही ज्या टूर कंपनी...
This Blogger got recognition from India Book of Records "Maximum Marathi blogs written and published by an individual" prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .