ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026. मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...
कुठे चाललो आहोत आपण. परिस्थिती किती गंभीर आहे. रोज होणार्या बाधितांचा 10000 चा आकडा 25000 च्या वर पोहोचलाय. म्हणून कपाळाला हात लावून , हतबल होऊन बसायचं अस नाही म्हणत मी. पण विचार करायची पध्दत बदलायली हवीय.
अमिताभ बच्चनच्या गत आयुष्यात काय झालंय याचा विचार करायची गरज नाही वाटत मला. पण सिनीयर सिटीझन झाल्यापासून अमिताभचे आयुष्य जगणं . अतिशय शिस्तबध्द असेच आहे. हे 25 टक्के लिव्हर वर जगणार्या , पण तरीही एवढं एनर्जीटिक असणार्या , क्षय रोगाचा प्रादुर्भाव होऊन गेलेल्या माणसाच्या जीवन शैली वरून सहज लक्षांत येण्यासारखे आहे. एका आलिशान बंगल्यांत वास्तव्य , पैशाला काही कमी नाही. दिवसातून दहा वेळा सॅनिटाईज करता येईल एवढा पैसा आणि मनुष्यबळ. जो व्यक्ती कोरोना पासून बचाव कसा करावा हे लोकांना समजावतो. एवढच नाही तर आरोग्य सेतू मध्ये ज्याचा व्हिडीओ आहे. असा व्यक्ती बेफिकीर पणे वागला असेल, या गोष्टी वर माझा तरी विश्वास नाही. असा व्यक्ति जर कोविडने ग्रस्त होत असेल तर ते निश्चितपणे विचार करण्यासारखे आहे. विचार करायला लावणारे आहे आणि कोरोनाची दाहकता दर्शविणारे आहेत. आपण आपली अधिक काळजी घ्यायला हवी.
हा आपल्या प्रत्येकाच्या जीवन मरणाशी निगडित असा मुद्दा आहे. आपण त्यावर जोक्स करतोय. आपण हसायचं नाही जोक्स् करायचे नाही अस कुठे आहे. फक्त एवढ्या गंभीर मुद्द्यावर आपण तेवढ्याच गंभीरपणे प्रतिक्रिया द्यायला हवी. एवढचं म्हणणं आहे. कदाचित सर्वाना नाहीही पटणार. पण हे गृहित धरूनच पोस्ट करतोय.
Very true. At this moment, the entire mankind seems to be under Corona grip. At this moment, only precautionary steps are in the hands of mankind. As you rightly said the veteran actor must have definitely taken due precautions. Still he couldn't escape means that we are yet to resolve the corona mystery. We can only pray the advent of successful corona vaccine or treatment. Definitely this pandemic has taught humankind a great lesson. Excuse for not using Marathi as the google linguistic keyboard not working on this mobile.
ReplyDelete