ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
ब्लॉग सं. 2025/238. दिनांक:2 7 ऑगस्ट,2025. मित्रांनो, एका आठवड्यात 2,50,000 पावलं चालण्याचा अनुभव सर्वप्रथम, सर्वांना श्री गजाननाच्या आगमनाच्या भक्तीपूर्वक शुभेच्छा.तो तुमचं आयुष्य मंगलमय बनवो. परदेशातील लोक काय करतील याचा काही नेम नाही.एका ब्रिटिश पठ्याने एका आठवड्यात चक्क 2,50,000 पावलं चालण्याचा पराक्रम केला आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात चालण्याला आपण फारसं महत्त्व देत नाही. “फक्त चालणं” इतकं सोपं वाटणारं काम प्रत्यक्षात आपल्या शरीरावर , मनावर आणि जीवनशैलीवर किती खोल परिणाम करू शकतं, याचा उत्तम अनुभव ब्रिटिश युट्यूबर जॅक मॅसी वेल्श याने घेतला.आजच्या ब्लॉगमध्ये वाचा त्याची कथा. सविस्तर: ब्रिटिश युट्यूबर जॅक मॅसी वेल्श याने,फक्त सात दिवसांत 2,50,000 पावलं चालून दाखवली. म्हणजे दररोज सरासरी 35,700 पावलं किंवा तब्बल 17 मैल – जे अर्ध्या मॅरेथॉनपेक्षा अधिक आहे . पहिल्या दिवशी वेल्शने सकाळ-संध्याकाळ चालून आपलं लक्ष्य गाठलं. त्याला वाटलं , “ हे फक्त एक पाऊल दुसऱ्याच्या पुढे ठेवणं आहे”.पण दुसऱ्या दिवस...