ब्लॉग नं: 2025/284 दिनांक:9 ऑक्टोबर, 2025. मित्रांनो: पंडित चुन्नीलाल मिश्रा: संगीत उपासकाचे चरित्र आणि योगदान “ संगीत म्हणजे आत्म्याचा प्रवास आहे, जिथे प्रत्येक सूर तुम्हाला तुमच्या स्वतःकडे परत आणतो.” असं म्हणायचे ते पंडित चुन्नीलाल मिश्र.त्या आता आपल्यात नाही राहिले.2 ऑक्टोबर,2025 ला उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे त्यांचे निधन झाले.आज ब्लॉग त्यांना श्रद्धांजली म्हणून समर्पित करतो. सविस्तर: प्रारंभिक जीवन आणि संगीत शिक्षण: पंडित चुन्नीलाल मिश्रा यांचा जन्म 3 ऑगस्ट 1936 रोजी,उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील हरिहापूर गावात झाला.त्यांचे पहिले गुरू त्यांचे वडील बद्री प्रसाद मिश्रा होते , त्यांचे वडील पंडित बद्रीप्रसाद मिश्र स्वतः एक कुशल गायक होते.ज्यांनी त्यांना संगीताची मूलतत्त्वे शिकवली. त्यानंतर त्यांनी उस्ताद अब्दुल गनी खान (किराणा घराणे) यांच्याकडून संगीताचे प्रकार शिकले.तसेच , ठाकूर जयदेव सिंग सारख्या संगीतकारांनी त्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन केले. बालपणीच त्यांना जाणवले की,संगीत हा केवळ आवाजाचा खेळ नाही,तर तो अंतरात्म्याशी स...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .