ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
ब्लॉग नं :2025/34 2 . दिनांक : 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, हिवाळा आला की, थंडीबरोबर अनेक छोटे–मोठे त्रासही सुरू होतात.जसे की, थकवा वाढणे , सर्दी-खोकला होणे , रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे… अशा वेळी आपण उबदार कपडे घालतो , पण कपड्यांपेक्षा आहार अधिक महत्त्वाचा असतो. भारतीय घरांत अनेक वर्षांपासून एक खास पदार्थ खाल्ला जातो, तो म्हणजे गूळ आणि भाजलेले चणे अर्थात फुटाणे . हा साधा दिसणारा पदार्थ म्हणजे प्रत्यक्षात एक सुपरफूड संयोजन आहे. आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये याविषयी सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर: गोड गूळ आणि कुरकुरीत फुटाणे मिळून शरीराला उब , ऊर्जा व पोषण देणारा एक उत्तम हिवाळी आहार मानला जातो. चला तर मग जाणून घेऊया या पारंपरिक पदार्थाचे आरोग्यदायी फायदे. 1.हृदयासाठी सर्वोत्तम — गूळ + फुटाणे: गूळात लोह आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते.लोह रक्तप्रवाह सुरळीत ठेवते.तसेच पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.हरभऱ्यामध्ये कॅल्शियम , मॅग्नेशियम , फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. हे ‘वाईट’ कोलेस्टेरॉल कमी करून हृदयरोगाचा धोका कमी करतात. नियमित गूळ सेवनाने अशक्तपणा रोखत...