ब्लॉग नं. 2025/30 9 . दिनांक: 3 नोव्हेंबर 2025. मित्रांनो, दर वर्षी प्रमाणे दिवाळी आली की,दिवाळी अंक बाजारात येऊ लागतात.या वर्षी देखिल,अनेक नामवंत प्रकाशकांनी आपापले दिवाळी अंक प्रकाशित केले.त्या सोबतच काही लहान लहान प्रकाशन संस्थांनी देखिल आपले दिवाळी अंक बाजारात आणले.काहींनी ई-दिवाळी अंक प्रकाशित केले.या वर्षीच एक वैशिष्ठ म्हणजे, अनुवादकांचा व्हॉटसअॅप समूह असलेल्या, “अनुवादक मंच” ने आपला पहिला ऑनलाइन दिवाळी अंक,“अनुवादविश्व दिवाळी अंक 2025” हा प्रकाशित केला.”अनुवादक मंच” हा 150 अनुवादकांचा एक समूह आहे.हा अंक विविध भाषातील साहित्याचा अनुवाद करणाऱ्या अनुवादकांचा असल्याने, विविध देशातील,प्रदेशातील साहित्याचा स्पर्श या अंकाला लाभला असल्याने,हा एक वैशिष्ठपूर्ण असा दिवाळी अंक झाला आहे.आजचा ब्लॉग या दिवाळी अंकास समर्पित आहे. सविस्तर: अनुवादक म्हणजे केवळ एका भाषेतील साहित्य,दुसऱ्या भाषेत अनुवाद करणारा ...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .