Skip to main content

Posts

Showing posts from October, 2022

Select your Language

नोटांवरील चित्र आणि बरेच काही

  मित्रांनो,  नोटांवरील चित्र आणि बरेच काही  :-             आज काल देशांत काही तरी वाद निर्माण करायचा आणि देशातील सामान्य माणसाचे समस्यांकडील लक्ष दुसरीकडे वळवायचे. असे उद्योग सुरु आहेत. नुकतेच नोटांवर हिंदू देवदेवतांची चित्रे छापावित असे ट्वीट करण्यात आले आणि त्यानंतर प्रत्येक जण नांव सुचवू लागला.कुणी छत्रपती शिवाजी महाराज,कुणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कुणी स्वा.सावरकर, कुणी अगदी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचे नांव सुचविले. खरं तर सध्या महात्मा गांधीचे चित्र ते बदलवायची काही गरज नाही आणि कुणी तसे सुचविले नाही.पण नवीन काही तरी कुणी तरी सुचवायचे आणि मग  त्याला इतरांनी विरोध करायचा असे सुरु आहे. नोटांवर कुणाचे चित्र असले काय आणि नसले काय त्याने सामान्य जनतेला काहीच फरक पडत नाही. महात्मा गांधी यांचे  चित्र असलेल्या नोटा लाच म्हणून स्वीकारल्या जातात आणि त्या दडवून ठेवल्या जातात. ह्याहून दुर्दैवाची गोष्ट कुठली.भ्रष्टाचाऱ्याला त्या नोटांवरचे महात्मा गांधी यांचे  चित्र बघून देखिल लाज, शर्म वाटत नाही.मग काय ...

संबंध प्रस्थापित करण्याची घाई

                                                                                                                 नमस्कार,               आम्हा भारतीयांना संबंध प्रस्थापित करण्याची अतिशय घाई असते. आपल्या शहरांत एखादा जिल्हाधिकारी आपल्याच आडनावाचा आला की झाले,त्याचे आपले नाते किती जवळचे आहे हे सांगण्याची,आपल्याला खूप घाई झालेली असते.ही घाई तोपर्यन्त टिकते,जोपर्यंत आपल्याला एखादा अत्यंत जवळचा  मित्र येऊन, कलेक्टर ऑफिस मधले त्याचे काम,आपल्या ओळखीने, करून देण्याची गळ घालत नाही. असे कुणी काम सांगितलेच तर, पोस्ट मिळाली खूप गर्व होतो एकेकाला,असेच असते रे,आपल्या लोकांचेच काम करीत नाही.नंतर तो आपला so-called नातेवाईक जिल्हाधिकारी, कसा घाबरट आ...

इस्त्रीचे कपडे की चेहरा

                        इस्त्रीच्या कपड्यावरुन आठवले. आज बहुधा निवृत्तीनंतर पहिल्यांदाच ज्याला फॉर्मल म्हटले जाते ते म्हणजे शर्ट आणि टेरीकॉटची पॅन्ट घालून गेलो असेन. निमित्त होतं, दोन सत्कार सोहोळयांचे.माझा लेखक म्हणून सर्वात आधी सत्कार झाला तो 14 डिसेंबर 2021 ला बँक ऑफ इंडिया, झोनल ऑफिस, कोल्हापूरच्या हॉलमधे. झोनल मॅनेजर श्री. हेमंत खेर सर यांच्या  शुभ हस्ते हा सत्कार आणि माझ्या "होस्ट इज घोस्ट" ह्या कथासंग्रहाचे प्रकाशन  संपन्न झाले.त्याचा आनंद, मित्रांनो,काही वेगळाच होता.गेल्या 38 वर्षे एक कुटुंब समजून मी ज्या बँक ऑफ इंडियामधे होतो. त्या माझ्या लोकांनी , घरच्या लोकांनी केलेला सत्कार मला रोमांचित करून गेला.                         बरोबर 10 महिन्यांनी म्हणजेच 14 ऑक्टोबर,2022 ला वाकड,पुणे येथील शब्दा बुक्स आणि लायब्ररीने कस्पटे सभागृहात  "साहित्यातील योगदाना" बद्दल माझा सत्कार केला. वाकड येथील वाचक प्रेमी मोठ्या संख्येने ह्या कार...