ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
B log No. 2023/41 Date: 18th, February 202 3 . मित्रांनो महाशिवरात्र हा एक हिंदू सण आहे.जो देशभर साजरा केला जातो. तसे तर शिवरात्र ही प्रत्येक महिन्यात शिवरात्र ही साजरी केली जाते.पण हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या आगमनापूर्वी (फेब्रुवारी/मार्च) महिन्यात येणारी शिवरात्र ही महाशिवरात्र म्हणून साजरी केली जात असते. महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडव नृत्य केले होते असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या पूजेसंबंधी थोडे काही महाशिवरात्रीला पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, तूप,शेण,गोमूत्र आणि दहयाने शिवलिंगाला अभिषेक केला जातो.त्या नंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर उपवास केला जातो. भगवान शंकराची पूजा, आराधना केली जाते. ॐ नम: शिवाय ह्या जपाची एक माळ म्हणजे 108 वेळा म्हटलं जातो. त्या सोबत शंकराच्या पिंडीवर 108 बेल पत्र वहाण्याची देखिल परंपरा आ...