ब्लाॅग नं.2025/180 दिनांकः 30 जून, 2025. मित्रांनो , वाढत्या वजनाची समस्या आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. वाढते वजन कमी करण्यासाठी लोक विविध तंत्रांचा अवलंब करतात.ज्यामुळे त्यांना तंदुरुस्त राहण्यास मदत होते.यासाठी सोशल मिडियावर दररोज अनेक ट्रिक्स व्हायरल होत असतात. आजकाल जपानी वॉक खूप ट्रेंडिंग आहे. ते कसे करायचे आणि वजन कमी करण्यासाठी ते प्रभावी आहे का ते आपण आजच्या या ब्लॉग मधून जाणून घेऊयात. सविस्तरः आजकाल सर्वजण दिवसभर कामात इतके व्यग्र असतात की , स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ काढू शकत नाहीत.यामुळेच लठ्ठपणासह अनेक आजार वेगाने आपल्या शरीरात वाढत असतात. अशा परिस्थितीत अनेकजण सोप्या , पण प्रभावी पद्धती शोधत असतात , ज्या जड व्यायामाशिवाय वजन कमी करण्यास मदत करू शकतात. यासाठी अनेक प्रकारची सूत्रे ट्रेंडिंगमध्ये असल्याचे आपण पाहतोच. अशीच एक पद्धत अलिकडच्या काळात चर्चेत आली आहे , ज्याला जपानी वॉक असे म्हणतात. जपानी वॉक आजकाल खूप लोकप्रिय होत आहे आणि तज्ञ देखील वजन कमी करण्यासाठी हा वॉक प्रभावी मानत आहेत. ही एक सामान्य चाल नाही , तर जपानमध्ये वर्षानुवर्षे अवलंबली जाण...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .