Skip to main content

Posts

Showing posts with the label Tourism

दररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते?

  ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025.   मित्रांनो,              माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर:          लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...

रात्रीच्या प्रवासासाठी रेल्वेचे नवे नियम

  Blog No.2023/319.   Date: -28 th , December 2023.   मित्रांनो,             तुम्ही रेल्वेने रात्री प्रवास करत आहात.सहप्रवाश्यांचे मोबाईलवर मोठमोठ्याने बोलणे,रात्री दिवे सुरु ठेवणे किंवा मोबाईलच्या स्पीकरवर रात्री विडियो पहाणे,संगीत ऐकणे.या समस्यांना तुम्ही सामोरे जात असाल तर तुमच्या साठी आता एक गुड न्यूज आहे. काय आहे गुड न्यूज पाहूया आजच्या ब्लॉगमध्ये.   प्रास्ताविक             तुम्ही रात्री ट्रेनने प्रवास करत असाल तर यापुढे तुम्हाला असे अनुभव येणार नाही. कारण, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन ( IRCTC) ने रात्री ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.सर्व प्रवाशांना आराम मिळावा यासाठी ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत. रात्री १० नंतर ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांनी खालील मार्गदर्शक तत्त्वे लक्षात ठेवावीत.   रात्री 10 नंतर ऑनबोर्ड प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे 1.   ...

प्रजापिता ब्रम्हा कुमारी विश्व विद्यालय, माऊंट अबू

  Blog No.2023/314.   Date: -23 rd , December 2023.   मित्रांनो,             कालच्या ब्लॉगमध्ये दिलवाडा मंदिर, नक्की लेक आणि टोड रॉक विषयी आपण बघितलं.आज बाकी स्पॉट म्हणा स्थळ म्हणा,माहिती करून घेऊ.माऊंट अबूला आम्ही गेलो तेव्हा थंडी प्रचंड होती.म्हणजे 8 डिग्री एवढे तापमान होते.थंडीसाठी महाराष्ट्रात जी आयुधे आपण वापरत असतो,ती सारीच आयुधे तिथे कुचकामी ठरतात.म्हणून आम्ही पुण्याला रमेश डाईंगमध्ये जाऊन खरेदी केली.तिथे त्यांनी कुठे फिरायला जाताय,ते विचारले.ते सांगिल्यावर योग्य ते कपडे दाखविले. प्रजापिता ब्रम्हा कुमारी विश्व विद्यालय                प्रजापिता ब्रम्हा कुमारी विश्व विद्यालय आंतरराष्ट्रीय , गैर-सरकारी आध्यात्मिक संस्थेचे मुख्यालय माउंट अबू येथे आहे.सगळ्यात आधी आम्ही तेथील “ यूनिवर्सल पीस हॉल ” ला गेलो.तिथे पोहोचताच एक भगिनी आम्हाला दोघांना आंत घेऊन गेली आणि तिने हॉलमध्ये जातांना त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली.त्या भगिनीने सगळ्यात आधी आम्हा...

माऊंट अबू राजस्थानातील एकमेव हिल स्टेशन

  Blog No.2023/313.   Date: -22 nd , December 2023.   मित्रांनो,             मध्यंतरी मी सापुताऱ्याला जाऊन आल्यानंतर एक ब्लॉग सापुताऱ्याबद्दल लिहिला होता. तेव्हा मी माऊंट अबूला देखिल जाऊन आलो होतो.पण मध्यंतरी trending असे काही टॉपिक्स येत गेले आणि त्यामुळे त्यावरील ब्लॉग लिहायचं राहून गेलं होतं.माऊंट अबूला बरेच काही पहाण्यासारखं आणि माऊंट अबू बद्दल बरेच काही लिहिण्यासारखं देखिल आहे. म्हणून आज उद्याचा आणि कदाचित परवाचा ब्लॉग असणार आहे माऊंट अबूवर.   प्रास्ताविक             मी सापुताऱ्याहून माऊंट अबूला कारने गेलो होतो.पण तुम्हाला जायचं असेल तर कसं जायचं हे सांगतो. माऊंट अबू हे अहमदाबादहून रोडने 226 किमीवर आहे आणि रोडने पोहोचायला 5 तास लागतात.तसं जातांना मेहसाणा आणि पालनपूर ही गुजरात राज्यातील दोन मोठी गांवे लागतात.जवळपास 200 किमी तुम्ही चार तासात जाऊ शकता, कारण रस्ता छानच आहे.पण जवळपास 28 किमी रस्ता हा घाटाचा आणि वळणावळणाचा आहे,त्यामुळे 28 किमीला 1 ता...

"पहिले भारतीय गाव माणा."

  Blog No. 2023/10 5            Date: 30th, April 2023.      मित्रांनो,             आपल्या देशात काही नवीन गोष्टी घडत आहेत.ह्याचे श्रेय निश्चितपणे केंद्र सरकारला आणि त्या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते.गोष्टी लहान लहान असतात पण हिंदीत म्हणतात ना “छोटी छोटी बाते भी माईने रखती है.” बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ( BRO) ने माणा गावात एक साइनबोर्ड लावला आहे , जिथे लिहिले आहे "पहिले भारतीय गाव माणा." हेच माणा गाव पूर्वी भारतातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जायचे. आजच्या ब्लॉग मध्ये सविस्तर जाणून घेऊया. प्रास्ताविक माणा हे भारतातील उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात वसलेले एक छोटेसे गाव आहे. हे भारत-तिबेट सीमेजवळ वसलेले आहे आणि भारतातील अनेक सीमावर्ती गावांपैकी एक आहे.माणा हे गांव आकाराने जरी लहान असले , तरी लोकप्रियतेचा विचार करता ते खूप महत्वाचे आहे. माना गावाबद्दल येथे काही मनोरंजक तथ्ये आहेत.त्यातील एक म्हणजे , हे गाव पांडवांचे जन्मस्थान असल्य...

माझा विदर्भाचा फेरफटका

Blog No.2023/002 Date:- 6th, January 2023  मित्रांनो,             नुकताच मी माझ्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत जाऊन सफर करून आलो.नोकरीतून निवृत्ती होईपर्यन्त कुणाकडे,अगदी जवळच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन राहिलो,असा निवांत मिळाला नव्हता.मार्च,2020 ला जेंव्हा सेवानिवृत्त होणार होतो, तेव्हा खरं तर मनोमन हे ठरविलेले की 15 एप्रिल 2020 पासून छान दौरा काढायचा. अगदी अहमदनगर पासून ते गोंदिया पर्यन्तच्या सगळ्या नातेवाईकांकडे आणि जिवलग मित्रांकडे जाऊन रहायचे, पण कोविड 19 ने माझा सगळा प्लान चौपट केला.त्या नंतर वेळ मिळाला तो आता डिसेंबर 2022 मधे.             समृद्धी महामार्ग नुकताच सुरु झाला होता.त्याने नागपूरला सफर करायची इच्छा होती.ती या निमित्ताने सफल झाली.जवळपास 16 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलो.राजुरा खरं तरं नातेवाईक कुणी नाही असे म्हणताच येणार नाही एवढा प्रचंड जिव्हाळा,प्रेम आणि आपुलकी अनुभवावयास मिळाली. वर्ध्यात ट्रेड फेअरचे आयोजन भावाच्या घरासमोरील मैदानात आयोजित केले होते. तिथे सह...