Skip to main content

Posts

Showing posts with the label emotional

या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या !

  ब्लॉग नं. 2025/30 7. दिनांक: 1 नोव्हेंबर 2025. मित्रांनो,   “या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या !” “ जिथे तुमची कदर नाही तिथे का राहावे ? भारतमातेला तुमची गरज आहे , आणि तुमचे स्वागत आहे!”  झोहो कॉर्पचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांचे हे शब्द केवळ एक ट्वीट नाहीत , तर प्रत्येक भारतीयाचे,  स्थलांतरितासाठी अंतर्मनाला स्पर्श करणारे आवाहन आहे.आज जगभरातील अनेक भारतीयांनी त्यांची बुद्धिमत्ता , कार्यकौशल्य आणि प्रामाणिकतेच्या जोरावर,परदेशात प्रतिष्ठा कमावली आहे.त्यांचे योगदान इतके मोठे आहे की,अमेरिकेच्या अर्थसंकल्पात भारतीय स्थलांतरितांनी गेल्या 30 वर्षांत सरासरी 1.7 दशलक्ष डॉलर इतके योगदान दिल्याचे आकडे सांगतात.हे सर्वात जास्त आहे,इतर कोणत्याही देशाच्या स्थलांतरितांपेक्षा.पण तरीही देखिल,अमेरिकेचे तोंडाळ राष्ट्रपती आपली मुक्ताफळे उधळीत आहेत.    वेम्बू यांनी याच आकडेवारीवर प्रतिक्रिया देताना म्हटले. “ भारताने त्याचे सर्वोत्तम पाठवले.” ही ओळ वेदनादायक आहे आणि अभिमानास्पदही आहे.वेदना कारण भारताने आपली प्रतिभा गमावली आहे. आणि  अभिमान,कारण त्या प्रतिभेन...