ब्लॉग नं. 2026/168. दिनांक: 17 जून, 2026. मित्रांनो , मोबाईल वापरताना ‘या’ 8 चुका टाळा ; आजच्या डिजिटल युगात , मोबाईल फोन आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत , फोन सतत आपल्यासोबत असतो.अनेकदा आपण सोयीसाठी किंवा सवयीमुळे फोन अशा ठिकाणी ठेवतो , जे आपल्या आरोग्यासाठी आणि फोनच्या आयुष्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते आणि विविध संशोधनानुसार , आपण फोन कुठे ठेवतो यावर आपले आरोग्य अवलंबून असते. चला तर मग जाणून घेऊया , आजच्या ब्लॉगमधे , अशा 8 जागांबद्दल,जिथे तुम्ही तुमचा फोन कधीही ठेवू नये. सविस्तरः 1. कपड्यांच्या खिशात ( In Your Pocket) आपल्याला फोन खिशात ठेवणे सर्वात सोयीचे वाटते , पण डॉ. लिली फ्रीडमन यांच्या मते , ही फोन ठेवण्यासाठी सर्वात वाईट जागा आहे. जास्त रेडिएशन : जेव्हा फोन चालू असतो आणि वायरलेस नेटवर्कला जोडलेला असतो , तेव्हा खिशात ठेवलेल्या फोनमधून पर्स किंवा होल्स्टरच्या तुलनेत 2 ते 7 पटीने जास्त रेडिएशन निघते. गंभीर आजारांचा धोका: या रेडिएशनमुळे ट्यूमरची वाढ होणे , डीएनएची रचना बदल...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .