Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

माझे नोकरीतील पहिले वर्ष


माझ्या बॅकिंग जीवनाची सुरूवात वर्धा जिल्ह्यातील सेलू नावाच्या छोट्या गावातून झाली. छोटे यासाठी की त्यावेळे पर्यत अशी गांव आणि खेडी ही केवळ चालत्या रेल्वेतुन आणि  बसमधून बघितलेली. अशा ठिकाणी रहाण्याचा अनुभव शुन्य पण कुतूहुल जरूर होतं. पण इतक्या लहान गावात आपण कधी जाऊन राहू अस कधीच वाटल नव्हतं. मोठ्या गांवात किंवा शहरात आताच्या मानाने सोयी सुविधा मानाने कमी असल्या तरीही त्याकाळी टेलिफोनही मोजक्याच घरी असायचं आणि बी एस एन एल चा लॅडलाईन असणं हे प्रतिष्ठित असण्याच लक्षणं समजलं जायचं. खुप जुनी नाही 40 च वर्षापुर्वीची ही गोष्ट आहे.हे बघितलं तर लक्षांत येत कि देशाने खुप प्रगती केलीय. 
सेलू हे वर्धा या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 15 कि मी दुर नागपूर वर्धा रोडवर वसलेलं एक छोटसच पण टुमदार गांव. वर्ध्याहून सेलूकडे जातांना वाटेत पवनार लागायचं. पवनार म्हणजे आचार्य विनोबा भावेंच गांव. तिथं त्यांचा आश्रम होता. धाम नदीच्या काठावर. मी जेव्हा सेलूला होतो. तेव्हा आचार्य विनोबा भावे हयात होते. त्यांची भेट घेण्याचा योग तेव्हा योग आला. भूदान चळवळी बध्दल काॅलेज जीवनांत खुप काही वाचलं होतं.त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा सेलू पोस्टींगच्या निमीत्ताने योग आला. सेलू केळीच्या बागांसाठी प्रसिध्द. धाम आणि बोर या दोन्ही नद्या आणि त्यावरील धरणं यानी सम्रृध्द असा हा परिसर. अगदी हिरवागार असायचा हा परिसर नेहमी. ज्यानं कधी लहान गांवात वास्तव्य केलेले नाही. त्याच्यासाठी नक्कीच हे अगदी छान ठिकाण होतं. बॅकेत 10 ते 12 जणांचा स्टाफ. कम्प्युटरायझेशन मुळे काम सोपी झाली असली तरी स्टाफ मध्ये जे सौहार्दपुर्ण नातं आणि एकजिनसीपणा होता. तो आजकाल आढळत नाही. मी जाॅईन झाल्यापासून ज्यांची आणि माझी अभेद्य अशी मैत्री झाली ते अनंत मिसे यांनीच मला रूम पाहून दिली. झोपण्यासाठी खाट, स्नानासाठी बादली , पिण्यासाठी भरून ठेवलेला माठ. सौजन्य घरमालक. खोलीवर कौले होती, मंगलोरी कौलं नव्हती जी मी पाहिली होती. जेवायसाठी एक राज्यस्थानी खानावळ होती. खिमजी भाई हाॅटेलचे मालक, अतिशय मनमिळावू स्वभावाचे. हळूहळू त्यांचा स्टाफ ,भाऊ यांच्याशी माझी ओळख झाली. मला झोप तशी कमीच आधी पासून. मी अगदी साडे पाचलाच चहा प्यायला हाॅटेलवर पोहोचत असे. वर्धा नागपूर रोड  वर असल्याने पंढरपूर. नांदेड, औरंगाबाद , जालना , लातूर , परभणी वरून रात्री निघणार्या सगळ्याच नागपूरसाठीच्या बसेस सेलूला थांबत.मी चहा प्यायला गेलो असतांना बसचे पॅसेंजर्स इथे चहा, नात्यासाठी उतरत. खिमजी भाईंचा भाऊ रमेश सकाळपासून तिथे असायचा. खुपदा तो सकाळचे विधी आटोपण्यासाठी जात असे. अशा वेळी जर बस आलेली असेल तर तो मला  साहबजी जरा गल्ला संभालोंगे. मै आया. असे म्हणून निघून जात असे. सुरूवातीला जरा विचित्र वाटलं. पण सवय झाल्यावर याचीही मजा घेतली. हा एक वेगळाच अनुभव होता. आयुष्यांत विपरित परिस्थितीने कणखर तर बनवलच पण सकारात्मक विचारांच्या  संस्कारांनी प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला शिकलो. मग घरमालकांशी अगदी घरगुती संबंध झाल्यावर मी आपला गाण्याचा छंद जोपासायला सुरूवात केली. सुधीर फडकेंची स्वर आले दुरूनी, प्रिया आज माझी, सखी मंद झाल्या तारका ही खुप छान गाणी होती. ती  सर्वच मी म्हणत असे. एक दिवस मी गाणं म्हणत असतांना पलिकडच्या खोलीतुन फर्माईश आली. सखी मंद झाल्या होऊन जाऊन द्या. पलीकडच्या खोलीतच अनंत मिसे रहात असतं. संगीत आणि साहित्य प्रेमी. मग हा सिलसिला सुरू झाला. पलीकडच्या खोलीतून फर्माईश यायची मी पुरवित असे.अशातच स्थानिक यशवंत महाविद्यालयांत भावगीत स्पर्धा होती. मिसेंनी खुपच आग्रह केला. मी स्पर्धेत भाग घेतला. पेटी तबला सगळी व्यवस्था झाली.सरावही केला. स्पर्धेत प्रिया आज माझी म्हटलं. दुसरे बक्षिस मिळाले. पहिले बक्षिस स्थानिकाला द्यायचं हा नियम पहिला दान देवाला प्रमाणेच पाळला गेला. बक्षिसाचं काही नाही हो पण गुणवत्ता जपायला हवी ना.पण बक्षिस समारंभात अंधश्रध्दा निर्मलन समितीचे श्री शाम मानव यांच्या हस्ते बक्षिस मिळालं अन् दुसरं बक्षिस वगैरे विसरायला झालं. सेलूला दीड वर्ष होतो.पण नोकरीची पहिली दिड वर्ष आणि लहान गावाचा पहिलाच अनुभव त्यामुळे सेलू नेहमी करिता स्मरणांत घर करून राहिलय.










Comments

  1. खूप चॅन लिहिले आहे सर. बँकेच्या नोकरीतील पहिले पोस्टिंग. ते गाव, तिथली माणसे, शाखेतील पहिला दिवस, तुम्हाला भेटलेले श्री अनंत मिसे सारखे समविचारी मित्र हे सगळं न विसरता येणारे. यातील काही गोष्टीबद्दल आपण खूप छान लिहिले आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...