ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
ब्लॉग नं. 2025/07 8 दिनांक:- 1 9 मार्च , 2025. मित्रांनो , मला आठवतंय 1985-90 चा काळ,नुकताच ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही वर्ध्यात आला होता.मी माझ्या घरी “कोणार्क” म्हणजे ओरिसा इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशनचा टीव्ही विकत घेतला होता. हे सांगायचं कारण म्हणजे 1985-90 या काळात साधारणतः फक्त “दूरदर्शन” हे फक्त एकच चॅनल दिसायचं आणि तेही घरावर तो अॅन्टेना लावूनच नव्हे,तर वेळोवेळी अॅडजस्ट करून.त्या काळात दर रविवारी दुपारी 1.30 वाजता प्रादेशिक चित्रपट इंग्लिश सबटाइटल्स सकट दाखविले जायचे.मी आणि आई,दोघेही हे चित्रपट पहात असू.ते सगळेच चित्रपट, पारितोषिक विजेते चित्रपट असतं.या गोष्टीची आठवण व्हायचे कारण म्हणजे,नुकताच मी एक हिन्दीमध्ये डब केलेला “ रेखाचित्रम्” हा एक सुरेख चित्रपट पाहिला.मला रहस्यमय थ्रिलर चित्रपट फार आवडतात.या चित्रपटात शेवट पर्यंत रहस्य टिकवून ठेवण्यात दिग्दर्शक जोफिन टी चाको कमालीचे यशस्वी झाले आहेत. आजचा ब्लॉग याच विषयावर. सविस्तर: चित्रपटाचे कथानक: चित्रपटाची सुरुवात भूतकाळात होते , एका काळोख्या आणि...