Skip to main content

Posts

Showing posts with the label gratitude

Select your Language

India Books of Records कडून सन्मान

ब्लॉग नं. 2026/2 98 . दिनांक: 26 ऑक्टोबर , 2026. माझ्या मराठी ब्लॉगलेखनाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद वाचकांच्या प्रेमाने , प्रोत्साहनाने आणि माझ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य झालेला आनंदाचा क्षण मित्रांनो , आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय आनंदाचा , अभिमानाचा आणि कृतज्ञतेचा आहे. माझ्या मराठी ब्लॉगलेखनाची India Book of Records मध्ये नोंद झाली आहे! हा सन्मान केवळ माझ्या लेखणीचा नसून , माझ्या प्रत्येक ब्लॉगला वाचणाऱ्या , त्यावर प्रेम करणाऱ्या आणि मला सातत्याने लिहिण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या आपणा सर्व वाचकांचाही आहे. आज या आनंदाच्या क्षणी माझा ब्लॉगलेखनाचा प्रवास तुमच्याबरोबर शेअर करावासा वाटतो. एका नव्या पर्वाची सुरुवात ! मार्च 2020 मध्ये मी बँक ऑफ इंडियामधून मुख्य व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झालो.योगायोग असा की , त्याच सुमारास कोविड- 19 च्या साथीने संपूर्ण जगाला वेढले आणि आपल्या जीवनशैलीत मोठे बदल घडू लागले. ऑनलाइन व्यवहार , डिजिटल माध्यमे आणि इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत होता.मला मात्र ब्लॉग म्हणजे काय , तो कसा लिहायचा , कुठे प्रकाशित करायचा , याबद्दल काह...