ब्लॉग नं. 2026/129. दिनांक: 9 मे, 2026. मित्रांनो, दुधाशिवाय कॅल्शियम ? हाडांच्या बळकटीसाठी दुधापेक्षाही सरस आहेत हे पदार्थ आपण लहानांपासून ऐकत आलो आहोत की , हाडांच्या बळकटीसाठी ' दूध ' हाच सर्वोत्तम उपाय आहे. दुधाला कॅल्शियमचा खजिना मानले जाते , हे खरेच आहे.पण , जर मी तुम्हाला सांगितले की दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असलेले,अनेक पदार्थ आपल्या आसपास सहज उपलब्ध आहेत , तर ? कदाचित हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल , पण ही वस्तुस्थिती आहे.चला तर मग , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण अशाच काही कॅल्शियमयुक्त पदार्थांबद्दल जाणून घेऊया,जे तुमच्या दैनंदिन आहाराला अधिक पौष्टिक बनवू शकतात. सविस्तर: दुधाचे प्रमाण आणि आपली गरज सुरुवातीला एक बेसिक गोष्ट समजून घेऊ.एका कपात (245 मिली) सुमारे 305 मिग्रॅ कॅल्शियम असते. प्रौढांसाठी कॅल्शियमचे दररोजचे शिफारस केलेले प्रमाण ( RDA) 1 ,000 ते 1,200 मिग्रॅ इतके आहे. याचा अर्थ , केवळ एक ग्लास दुध, हे तुमची दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही.तर मग , कॅल्शियमच्या पूर्ततेसाठी इतर कोणते पर्याय आहेत ? पाहूया: 1 . चीज आणि दुग्धजन्य पदार्थ : ·...
मग घरातून जेवायला यायचं निमंत्रण आलं. डाॅक्टरांच्या बहिणीने खुप छान जेवण बनवलं होत.चुलीवरचं जेवण साधंच होत. पण खुपच चविष्ट होतं. खुप दिवसांनी चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेतला होता. गप्पा मारता मारता जेवणं आटोपलं होतं. आमच्या रहाण्याची व्यवस्था गव्हर्मेट रेस्टहाऊस मध्ये करण्यांत आली होती. आमचे सामान गाडीत ठेवलेले होते. आम्ही टॅक्सीत बसलो. गावाच्या बाहेर अर्थात गांव सुरू होता होताच रेस्ट हाऊस होतं. समोर दोन दिवे रेस्ट हाऊसच्या डाव्या आणि उजव्या बाजूने असे तिरकस लावलेले होते
. म्हणायला तेवढाच फक्त उजेड होता. बाकी आजूबाजूला जंगल होते त्यामुळे अंधार होता. दिवे यासाठी म्हटलं कि ते आधी 25 ,60 किंवा 100 वॅटचे दिवे असायचे. ते दिवे होते. ट्युब लाईटही नव्हते. तिघा फॅमिलींना तीन रूम्स दिल्या होत्या. आम्हा दोघांच्या वाट्याला सगळ्यांत मधली आणि मोठी खोली आली होती. खोली नाही तो मोठा हाॅल होता. लग्नांत तशा हाॅलमध्ये 25-30 लोक सहज झोपले असते. डबल बेडचा मोठा पलंग देखिल एका कोपर्यात ठेवल्यासारखा वाटत होता. जरा वर छता कडे बघितले तर 25 फुट उंचावर मंगलौरी कौलांचे छत होते. 2-3 जुने फॅन लावले होते. त्यातला मधला हळूच सुरू केला तसा हेलिकाॅप्टर जवळचं कुठे लॅड होतय अस वाटलं. थोडा वेळ आम्ही सगळे आमच्या रूम मध्ये गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यांत डाॅक्टर आले. काय कशी वाटली व्यवस्था , ठिक आहे ना.? आम्ही म्हटलं हो छान व्यवस्था केलीत. गांवाच्या मानाने व्यवस्था निश्चितपणे चांगलीच होती. रूममध्ये नाईट लॅम्प नसल्याचं डाॅक्टर म्हणाले. आम्ही हरकत नाही म्हटले कारण शहरात बाहेरून खुप उजेड येतो. त्यामुळे नाईट लॅम्पची गरज भासत नसे. मग दुसर्या दिवशी लवकर निघायच असल्याने आता आराम करावा असं ठरल. सगळी मंडळी आपआपल्या खोलीत गेली. हाॅलला पाठीमागच्या भिंतीत एक मोठी खिडकी होती. सहज कुतूहुल म्हणून उघडली तर काय पलीकडे किर्र जंगल आणि अंधार आणि मुख्य म्हणजे खिडकीला ग्रीलच नव्हते. एका क्षणांत खिडकी बंद केली. मनांत विचार आला. ही खिडकी कुणीही तोडून सहज आत येऊ शकतो , जंगली प्राण्यासोबत इतरही धोके होते तिथे. मी हादरलो होतो. त्यातच लाईट बंद केला तर नुसता अंधार. उजेडातही झोप लागली नसती. म्हणून बंद करून जवळचा टाॅर्च थोडा वेळ चालू ठेवला. म्हटलं झोप आली की बंद करू. आजूबाजूला जंगलच असल्याने रातकिड्यांच्या ओरडण्याने वातावरण अधिक भितीदायक झालं होत. त्यात सौ ची झोप हुकमी होती. तिला झोप लागल्यावर किती तरी वेळ मी एकटाच जागा होतो. रात्री श्वापदांचे वेगवेगळे आवाज ऐकायला येत होते. छत उंच असल्याने छताकडे बघितलं कि अधिकच भयाण वाटत होत. लहानपणी एकदा आजोळी मंगलौरी कौलांच्या छतावर नाग आढळला होता हेही नेमकं आताच आठवायचं होतं. अस ईकडे तिकडे बघता बघता आणि विचार करता करता केव्हा झोप लागली कळल नाही. टाॅर्च मात्र रात्रभर चालू असावा. कारण सकाळी सुरू झाला नाही. पण त्याने नेमून दिलेले काम चोख बजावलं होत.
सकाळ झाली होती. मला तशी आधी पासून सकाळी 6 वाजताच जाग येते. दार उघडून बाहेर आलो. बाजुचा आसमंत तोच , चोहोबाजूला घनदाट जंगल. पण दिवस उजाडला कि मनातली भिती कशी पळून जाते कळत नाही काल रात्री सामसूम असलेल्या रस्त्यावर थोडी वर्दळ सुरू झाली होती. बाजूची दारं बंद होती. पण आतून बोलण्याचा आवाज येत होता. समोरून डाॅक्टर साहेब येतांना दिसले. पाठोपाठ चहाची किटली वालाही येतांना दिसत होता. नमस्कार मी म्हटले. त्यांनीही नमस्कार म्हटले. त्यांचा आवाज ऐकून अजय आणि गुलाबराव बाहेर आले. नमस्कार चमत्कार झाले. डाॅक्टरांनी न्युज दिली कि हेमलकसा ,भामरागड ची परवानगी मिळाली नाही. नविन प्लॅन ठरला होता. सिरोंचाला जायचे ठरले होते. प्राणहिता नदीच्या पलिकडच्या तीरावर कालेश्वराचे सुप्रसिध्द मंदिर होते. नदीवर पुल नव्हता. नावेतुन पलीकडे जावे लागे. पलीकडचा तीर म्हणजे तेव्हाची आंध्र प्रदेशची आणि आताच्या तेलंगणाची सीमा. स्नान वगैरे आटोपून आम्ही तयार झालो. लगेच निघायचे होते कारण सिरोंचा 100 कि. मी वर होते. दोन अडीच तास लागणार होते. नंतर नागपूरलाही परतायचं होतं.
सिरोंचा च्या दिशेने गाड्या निघाल्या.
क्रमशः ......... पुढील भागात....
Comments
Post a Comment