ब्लॉग नं. 2025/129 दिनांक: 10 मे, 2025. मित्रांनो , “प्रेम केलं प्रेम, काय हा झाला गुन्हा? अंतरीची भावना सांगू कुणा?” कुमार गंधर्व यांच हे गाणं. अगदी खरा प्रश्न विचारला आहे.पण प्रेम ही केवळ कवि कल्पना नाही आणि प्रेम फक्त रोमान्सपुरतं मर्यादित नसतं, ते आई-वडील , मित्र-मैत्रिणी , निसर्ग , कला , ज्ञान आणि स्वतःबद्दल असू शकतं. प्रेमाचं खरं रूप म्हणजे दुसऱ्याच्या अस्तित्वाचा आदर आणि त्याच्या आनंदात स्वतःचं सुख मानणं.प्रेम यापेक्षा वेगळं काही असलं तर.जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: प्रेमाचे किस्से अगदी रोमियो जुलीएट, लैला मजनू पासून तर अगदी,आपल्या पुराणातील दुष्यंत शकुंतला यापासून ऐकायला मिळतात.इतकंच काय,संपूर्ण मानवी इतिहासात,लोक सतत प्रेम नावाच्या खोल भावनेने मोहित झालेले आहेत.पण मानवी मेंदूतील रासायनिक हालचाली,प्रेम निर्माण करतात असं जर मी म्हटलं तर तुम्हाला पटेल ते.पण प्रेमात काय काय घडतं, वैज्ञानिक संशोधनातून प्रमाण...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .