ब्लॉग नं. 2026/1 71. दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...
माझ्या नोकरीतील शेवटच्या एल टी सी साठी मी राजस्थान ची निवड केली . भारंभार प्रेक्षणिय स्थळ न निवडता. जयपूर , रणथंबोर, अजमेर जवळील पुष्कर सरोवर, अजमेर शरीफ दरगाह, जोधपूर आणि उदयपूर असा दौरा होता. 4 नोव्हे ते 11 नोव्हे 2019. जातांना येतांना फ्लाईट असल्याने वेळेची बचत झाली आणि प्रत्यक्ष साईट सिईंगला वेळ देता आला.
तुम्हाला वाटेल कि आता ह्या ट्रीपचे वर्णन या ब्लाॅग मधे असणार काय? नाही बिल्कुल नाही कारण साईट सिईंग म्हटल कि मला पु ल देशपांडेंनी केलेले वर्णन आठवतं. म्हणून तसल काही करणार नाही. पण मला राजस्थान मध्ये काही वेगळं आढळलं ते सांगणार आहे.
राजस्थान मध्ये किल्ल्यांचा रखरखाव पहाण्यासारखा आहे. तिथे किल्याचा काही भाग सरकारने व्यवसायिक उपयोगासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. जसे हॅडी क्राफ्ट , राजस्थानी पेहराव , कारिगरी चे स्टाॅल इ. या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्याचा उपयोग किल्ले संवर्धनासाठी केला जातो. त्यामुळे किल्ले सुस्थितीत आहेत. आपल्या इथे असे काही करायला हवे. असे मला वाटून गेले.
पर्यंटनाला वाहिलेले लोक आहेत. आम्ही ज्या टूर कंपनी च्या मदतीने राजस्थानला गेलो. त्या कंपनीने अगदी व्यवसायिक पध्दतीने टूर आखला होता. आम्हाला पुर्ण टूर साठी एक सिडान कार देण्यांत आली होती. तिचा ड्रायव्हर कमलेश याचा आमच्या प्रस्थानाच्या एक दिवस आधीच फोन आला. विमान लॅड होऊन आम्ही बाहेर पडताच मी इथे इथे उभा आहे असा सकाळी 5.30 ला फोन. ही गोष्ट वाखाणण्या सारखी होती. त्याच्या दिरंगाईने आम्हाला वेळ झाला असेही कधी घडले नाही.
आणखी एक गोष्टही कळली ती म्हणजे महाराजा आणि महाराणा यांतील फरक. महाराजा तो जो मुगलांना शरण गेला. महाराणा तो जो मुगलांना शरण गेला नाही. कमलेश हे देखिल सांगावयास विसरला नाही कि भारतात फक्त दोन राजे कि जे मुगलांना शरण गेले नाहीत. एक म्हणजे महाराणा प्रताप आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज . हे ऐकून अतिशय अभिमान वाटला.
अशा या द्रीप मधे 9 नोव्हेबरला दुपारी 12 च्या सुमारास आम्ही अजमेर सोडलं अन जोधपूर कडे निघालो . बरेच लांबचे अंतर असल्याने मधे एक दोन ठिकाणी चहा साठी कार थांबवली. पण जयपूर जेव्हा फक्त 50 किमी दूर होतं तेव्हा त्याने कार थांबवली. तेव्हा मी त्याला विचारलं अभी क्यो रोक दी कार , तर तो म्हणाला बुलेट बाबा का मंदिर है. फुल ,प्रसाद चढाकर आता हूॅ . आईये आप भी . पाहिले तर एक बुलेट ठेवली होती आणि लोक तिलाच हार चढवत होते. प्रसाद चढवत होते. कार सुरू केल्यावर मी कमलेश ला विचारल हा काय प्रकार आहे आणि जे ऐकले ते खरोखरचं अमेझिंग आहे.
खर तर या जागी 2-4 हाॅटेल्स , 15-20 हार फुले प्रसादाची दुकान आणि एक मंदिर या शिवाय दुसरे काहीच नाही. या ठिकाणची कहाणी अशी आहे कि, ओम बन्ना उर्फ ओम सिंह राठोड हा ठाकूर जोग सिंह राठोड ह्यांचा मुलगा. पाली जवळील चोटिला या गांवचा रहिवासी. 1991 च्या हिवाळ्यांत ओम आपल्या गावाकडे रात्रीच्या वेळेस आपल्या बुलेट 350 वर चालला होता. त्याचा अपघात झाला आणि या अपघातातच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांना ही बातमी मिळताच त्यांनी पंचनामा करून बुलेट ताब्यात घेतली आणि पोलिस ठाण्यात आणून ठेवली आणि आश्चर्य म्हणजे सकाळी पोलिस बघतात तर ती बुलेट ठाण्यातून गायब झाली होती. पोलिसांनी शोध सुरू केला आणि त्यांना कळले कि बुलेट अपघाताच्या जागी आहे. पोलिसांनी पुन्हा बुलेट ताब्यात घेतली आणि या वेळेस टॅक पुर्ण रिकामी करून ठाण्यांत ठेवली. पण दुसर्या दिवशी सकाळी बुलेट गायब होती आणि पोलिसांना अपघाताच्या ठिकाणीच सापडली. पोलिसांनी आता मात्र ती साखळ दंडांनी बांधून ठेवली. तरी तेच. अनेक नाना क्लुप्त्या करून देखिल हेच घडत होते.
शेवटी गावकर्यांच्या आग्रहाने आणि जोग सिंह ठाकूरांच्या विनंतीनुसार ती बुलेट अपघाताच्या ठिकाणीच ठेवण्यात आली. कालांतराने तिथे एक चबूतरा बांधण्यात आला. तिथे ओम बन्ना चा मोठा फोटो आणि बुलेट ठेवण्यांत आली. अशी आख्यायिका आहे की ओम बन्ना त्या रोडवरून जाणार्यांचे रक्षण करतो. तिथे गाडी अचानक थांबते किंवा स्लो होते. लोक खाली उतरून ओम बन्ना आणि बुलेटला फुल माला अर्पण करतात आणि पुढे जातात. त्या ठिकाणाला अक्षरशः तीर्थ क्षॆत्राचे स्वरूप प्राप्त झालयं. तिथे हाय वे वर धावणारे प्रत्येक वाहन थांबत होते. हार फुले घेऊन लोक ओम बन्ना आणि बुलेटला अर्पण करित होते आणि पुढे जात होते. इतकेच काय तर उदयपूर मध्ये देखिल ओम बन्नाचे मंदिर बांधल्याचे कळले. अशा गोष्टीवर विश्वास नसला तरी स्थानिकांच्या श्रध्देपुढे कधी कधी आपल्याला ही नत मस्तक होणे भाग पडते हेच खरे. कुणाच्याही श्रध्दांना ठेच पोहोचविणे मला कधी जमलं नाही, सुचलं नाही किंवा तसे करावेसे देखिल वाटले नाही. कारण आपल्या स्वतःच्या देखिल काही श्रध्दा असतात. त्यावर कुणाचे कमेंटस मला चालत नाहीत. तेव्हा तसे मलाही करण्याचा अधिकार नाही. प्रत्येकाने दुसर्याच्या श्रध्दांना जपलं तर निरर्थक वाद टळतो हेच खरे.
तर अशी ही अनोखी कहाणी राजस्थानात अनुभवास मिळाली.
Comments
Post a Comment