ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
नोकरी जर ट्रान्स्फरेबल असेल तर आपलं जीवन हे ट्रेन सारखं असतं. आपली बदलीची ठिकाणं म्हणजे त्यावरची स्टेशनं. एकदा बदलून दुसरीकडे गेलो कि ती माणसं आणि त्यातही तो स्टाफ परराज्यातील असेल तर भेटण्याचा योग दुर्मिळच असतो. अशा वेळी आपलं माणसं जोडण्याचं कौशल्य कामी येते. पुन्हा तेवढ्याने काम होत नाही. ती माणसं नेहमी करिता जोडून ठेवणं हे सुध्दा कसब तुमच्याकडे असायला हवं. मित्र म्हणून एकदा स्विकारलं की गुण दोषांसकट स्विकारायला हवं. हे करतांना आपणही दोषरहित नाही. हे स्वतःशी कबूल करावं लागत. काम सोप नाही पण करावं लागतं.
या अशा ट्रान्स्फर्स मध्ये भेटलेल्या अनेक मित्रांपैकी दोन मित्र म्हणजे अजय घाटे आणि गुलाबराव खडसे. अजय जरा धीर गंभीर प्रवृतीचा म्हणजे विनोदाचे हास्याचे वावडे आहे असे नाही. पण चेहरा नेहमीच काहीतरी गहन विचार करीत असल्यासारखा. त्याच्या मनांत काही चालत असावं पण तो ओठावर येऊ देत नसे. एखाद्या वेळेस असही असेल पोरकटपणा त्याच्या ठाई अजिबात नव्हता /नाही.तेच गुलाबराव अतिशय जाॅली ,माणसं जोडायची कशी हे गुलाबरावां कडून शिकावं. त्यांच्या त्या विशिष्ट लयीत मोबाईल नंबर सांगण्याच्या सवयीमुळे त्यांना फोन लावतांना बोटं नावाकडे जात नाहीत तर की पॅड कडे जातात अगदी आज पावेतो. उंची बेताचीच पण वागणं इतक राॅयल कि त्या उंची कडे कोण बघणार. दोघेही बॅकेतील सहकारी या व्यतिरिक्त संबंध एवढे घट्ट होण्यासाठी साम्य कोणतेच नाही. म्हणायला आम्ही कधी एकमेकांची मत छेदली नाहीत. एकमेकांच्या मतांचा आदर केला हाच आम्हाला जोडून ठेवणारा घट्ट दुवा म्हणता येईल.
नागपूरला असतांना एका रविवारी आम्ही म्हणजे मी आणि सौ. , खडसेंच्या घरी गप्पा मारायला गेलो. 2010 ची गोष्ट . त्यावेळेस लोक असे एकमेकांच्या घरी जात येत असत. एक दिवस जरा थोडा चेंज रूटीन पासून. अलीकडे हे सारे इतिहास जमा होत चाललय. आम्ही रविवारी पाच साडे पाचच्या सुमारास खडसेंच्या घरी पोहोचलो तर तिथे अजय आणि संजीवनी म्हणजे अजयची अर्धांगिनी बसलेले दिसले. गुलाबराव म्हणाले वा आज खुप छान योग जुळून आला. मग काय आमच्या मनसोक्त गप्पा झाल्या .खुप दिवसांनी तिघे असे एकत्र आलो होतो. वेगळेवेगळे तर भेट व्हायची आमची. एवढ्यात गुलाबरावांना कुणाचा तरी फोन आला म्हणून ते गॅलरीत गेले. मग आत येत म्हणाले, नातु साहेब डाॅ प्रमोद साळवेचा फोन होता. मला म्हणाले कि गडचिरोलीला या एकदा, भामरागडचा , हेमलकसाचा प्रोग्राम बनवू , तेव्हा मी त्यांना म्हटले साहेब घरी आले आहेत त्याना विचारून घेतो, येता का? डाॅ म्हणाले मग केव्हा येता आणि काय ते कळवा.
मग त्यानी अजयलाही विचारलं ,चलणार का. तो जाऊया म्हणाला. भामरागड आणि हेमलकसा एका दिवसांत जाऊन येण्यासारखे नव्हते. सुट्टी घ्यावी लागली असती .कमीतकमी एक दिवसाची तरी. सुट्टी अजयला मिळालीही असती. पण मी आणि गुलाबराव एकाच ब्रॅचला मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर. त्यामुळे आम्हाला दोघांना एकदम सुट्टी मिळाली नसती. मग रविवारला जोडून येणारी सुट्टी पाहायला कॅलेंडर हाती घेतलं. अगदी पुढच्या महिन्यात पहिल्याच आठवड्यात अशी सुट्टी होती. झाले ठरले होते. मी आणि सौ. , श्री व सौ खडसे आणि श्री व सौ घाटे अस जाण्याचं ठरलं. गुलाबरावांनी डाॅ. साळवेना कळविलं आणि टॅक्सीची जबाबदारी स्वतःकडे घेतली. सकाळी गाडीने खडसे कपल निघेल ते मि आणि मिसेस घाटे ना घेऊन आमच्या घरी येतील आणि आमच्या घरून हाय-वे जवळ असल्याने आमच्या घरूनच प्रस्थान करण्याचे ठरले.
नागपूरहून गडचिरोलीला जायचे दोन रस्ते होते. एक जाम, वरोरा , चंद्रपूरहून आणि दुसरा उमरेड , नागभीड असा जवळपास जंगली भागातून जाणारा रस्ता. हा जवळचा रस्ता आहे. 70 कि मी चा फरक आहे. आम्ही याच रस्त्याने जायचे ठरविले. आम्ही घरी आलो. मुलांना सांगितले. ते काही हरकत नाही जा म्हणाले.
ठरल्याप्रमाणे रविवार उजाडला. आम्ही तयारच होतो. इतक्यांत प्रसाद चला ,आलोय रे आम्ही. आम्ही सगळे ठिक 7.30 वाजता निघालो. उमरेड मार्गे जायचे ठरविले होते. त्याप्रमाणेच निघालो होतो. 11.30 पर्यत पोहोचू असा अंदाज होता. तेव्हा गुगल मॅप वगैरे तेवढंस् नव्हतं. कि मी चे फलक बघूनच अंतर किती उरलय. ते लक्षांत यायचं. दोन्ही बाजूला जंगल सुरू झालं ते एन्जाॅय करित आम्ही निघालो. आता तर कुठे सुरूवात होती. पुर्ण 2 दिवसाचा प्लॅन होता.
क्रमशः ...........2
Comments
Post a Comment