ब्लॉग नं. 2025/242 . दिनांक: 3 1 ऑगस्ट, 2025. मित्रांनो, अलार्मने उठणे धोकादायक ठरू शकते का ? आपल्यापैकी बहुतेक जण सकाळी उठण्यासाठी अलार्मवर अवलंबून असतो. " अलार्म नसेल तर वेळेवर उठणार नाही!" अशीच भावना मनात असते. पण कधी विचार केला आहे का , की हे अलार्म आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात ? आजचा ब्लॉग याच विषयावर आहे. सविस्तर: हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटल्समधील सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी नुकतेच सांगितले की , अलार्म वाजवून अचानक जागे होण्याने रक्तदाबात ( Blood Pressure) महत्त्वपूर्ण वाढ होते. संशोधन काय सांगते ? यूव्हीए स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार: 🔹 अलार्म वाजवल्याने जागे होणाऱ्यांमध्ये रक्तदाबात 74 % पर्यंत वाढ होऊ शकते. 🔹 नैसर्गिकरित्या जागे होणाऱ्यांच्या तुलनेत हा धोका खूप जास्त आहे. 🔹 विशेषतः 7 तासांपेक्षा कमी झोप घेतलेल्या लोकांमध्ये रक्तदाब झपाट्याने वाढतो. डॉ. कुमार यांच्या मते , हा अचानक वाढलेला रक्तदाब हृदयविकाराचा झटका ( Heart Attack) आणि स्ट्रोकचा ( Stroke) धोका वाढवतो. अलार्मच...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .