मित्रांनो आज एका वेगळ्या विषयावर मी हा ब्लॉग लिहीत आहे. माझी आज पर्यन्त एकूण 8 पुस्तके प्रकाशित झाली. सहा कथासंग्रह आणि दोन कादंबऱ्या. दृश्य-अदृश्य, सुनयना, होस्ट इज घोस्ट, चित्र आणि चेहरा, कथास्टक आणि मिली हे सहा कथासंग्रह आणि राणी तेजस्विनी व सहप्रवासी ह्या दोन कादंबऱ्या. त्या निमित्ताने पुस्तके आणि पुरस्कार ह्यांचा खूप जवळून संबंध आला आणि पुस्तकांना मिळणारे पुरस्कार किती अनमोल (?) असतात, ते पहिल्यांदाच कळून आले. ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, युवा पुरस्कार, सरस्वती सन्मान, क्रॉसवर्ड बुक्स अवॉर्ड इत्यादि सारखे सन्माननीय अपवाद वगळूया. मी एकदा फेसबूक पहात बसलो होतो.वाचनात आले,“इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर सेल्फ पब्लिशिंग ऑथर्स”, आपले नामांकन आताच सादर ( submit ) करा. मी त्यात दिलेला फॉर्म भरायला सुरुवात केली.नावं,गावं, मोबाईल नंबर,ईमेल आयडी,मग ज्या पुस्तकासाठी न...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .