Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

स्वप्न

स्वप्न
रात्री पडणारी स्वप्न ही खरोखर मनुष्याला मिळालेलं वरदान आहे असं मी म्हणेन. तुम्ही म्हणाल असं का म्हणतोय मी. स्वप्ना पुरत्या तरी काही गोष्टी आपण ज्या कधी करू शकत नाही त्या झालेल्या पाहिला मिळतात.स्वप्नांचे विविध प्रकार आहेत,  साधी सरळ स्वप्न , मनोरंजक स्वप्न , भीतीदायक अगदी हाॅरर फिल्म सारखी , वर्तमानाशी संबंध असलेली, काही वेळेस कधी गेलो नाही अश्या जागी गेल्याची स्वप्न, मेलेल्या व्यक्ती सोबतची स्वप्न ,अगदी कधीही न भेटेलेल्या   अनोळखी व्यक्तिंसोबतची स्वप्न , तरूण वयांत प्रेमांत पडलेले असाल तर आपल्या गांवात नसला तरी प्रेयसी सोबत समुद्रा काठी बसल्याची स्वप्न अशी एक ना अनेक. लहान पणी माझ्या वर्ग मित्राला त्याचे बाबा वर्ग शिक्षकांना रागावल्याची स्वप्न पडत असतं अन मग तो वर्गात त्या दिवशी मोठा बिनधास्त असायचा अन् नेमका शिक्षकांचा मार खात असे.
स्वप्न कुणा वयस्कर व्यक्तीला
सांगितली तर मात्र मोठा घोळ होत असे. स्वर्गीय किशोर कुमार यांचा मी चाहता. एक दिवस मी रात्री इंदोर हून अमरावतीला येत असतांना रात्री वाटेत खांडवा लागलं. रात्री दोन अडीचची वेळ असेल. किशोर कुमारचा जन्म खांडव्याचा आणि अंतिम संस्कार ही तिथेच पार पडले. मनांत येऊन गेल. इथेच उतरावं. खांडव्याला किशोरकुमारच्या घराचं एकदा दर्शन घ्याव आणि मगच पुढे जावं. पण नोकरी जे नाही करीत त्यांना हवीहवीशी वाटते. पण ही नोकरी मनासारखं वागू देत नाही हे त्यांना कसं कळणार.लगेच जाॅईन व्हायचं म्हणून विचार पाठीमागे सारला. मेळघाटच्या दिशेने गाडी जाऊ लागली तसं थंड हवेच्या झुळुकीने थोडी झोप लागली. सकाळी मी खुषीतच उठलो कारण किशोरकुमार मला गाण्याच्या टीप्स देत असल्याचं मला स्वप्न पडलं. अर्थात या सगळ्यावर माझा विश्वास नसल्यानं मी कुणाला सांगितलही नाही.फक्त हिला सांगितल. कारण मनी वसे ते स्वनी दिसे. यावर माझा पुर्ण विश्वास आहे. हे मी प्रत्यक्षांत अनुभवलं आहे. हे स्वप्न मी हिला सांगितल्यावर सगळ्यांना माहित होणार हे मला चांगलं माहित होत. अर्थात हे मी मुद्दाम केलेले नव्हते. पण तिच्या शिवाय कोण आहे जवळच. अर्थात मला जे कुणाला सांगायचं नव्हतं ते सगळ्यांना कळल होत. असो मुद्दा हा नाही. हे स्वप्न इतरांना सांगितल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया ही खुप ऐकण्यासारख्या होत्या. काहींनी खुप छान म्हटले काहीनी तो म्हणतोय तर आलाही असेल किशोरकुमार त्याच्या स्वप्नांत अस खवचट भाष्य केलं तर काहीनी मृत व्यक्ती सोबत बोलल्याचं स्वप्न पडलं हा शुभ संकेत नाही संभाळून रहा अस म्हटल , यांतल संभाळून कसं रहायचं हे मला कळलं नाही अन् त्यानाही सांगता आलं नाही. मी विचारल ,तेव्हा म्हणतात रे असं म्हणून त्यानी वेळ मारून नेली. काहींनी टिंगल करण्यासाठी किशोरकुमारचा आवाज अजूनही तसाच आहे का रे?कारण म्हातारा झाला असेल ना आता. माझ्या बहिणीच्या घरी मी 1978-80 या काळांत शिकायला होतो. माझ्या भावजींना एक स्वप्न नियमित पणे पडत असे त्यांच्या आईला गुंडाने धरले आहे. गुंड आईच्या मागे उभा आहे. तिचे तोंड एका हाताने त्यानं दाबून ठेवलय. दुसर्या हातात रिव्हाल्वर आहे. जे त्याने आईच्या कानावर रोखून धरलयं. ते झोपेत ओरडले , त्यांची चक्क बोबडी वळलेली होती. पण इतकं असूनही ते  झोपेतचं असायचे फक्त मला अन् ताईला जागं करून. अस खुपदा झालं. तेच रिपीट टेलिकास्ट केल्यासारखं. मी रोज काॅलेजला जायचो ज्या रस्त्यान जिजाजी जायचे. एक दिवस मला बसमध्ये डाव्या हाताला बसायला जागा मिळाली होती. नासिक रोड आलं अन् लगेच अनुराधा टाॅकिज . अमिताभ बच्चन चा कस्मेवादे लागला होता. पोस्टर वर अचानक नजर गेली. मोठ्या पोस्टरच्या खाली एक छोट पोस्टर दिसलं आणि स्वप्नाचा सगळाच उलगडा झाला होता. अमिताभ राखीला धरून उभा आहे आणि पोझ तिच जिजाजींच्या स्वप्नातली. त्यांची आई त्यांच्या सोबत रहात नव्हती पण तिच्यावर भयंकर प्रेम. रोज ड्युटीवर जातांना ते पोस्टर पहात असावे. मी घरी परतल्यावर त्यांची मजा घेतली. तो स्वप्नातला गुंड कस्मेवादेतल्या   अमिताभ सारखा दिसतो का हो? ते हसले आणि म्हणाले कि हो यार. तरी मी आठवत होतो. याला कुठेतरी  पाहिलंय. मी म्हटलं नाशकांत संजीवकुमारचा  पती, पत्नी और वो लागलाय त्याच पोस्टर पाहू नका म्हणजे झालं. एकंदरीत काय तर मनी वसे ते स्वप्नी दिसे हेच खरं आहे. तेव्हा रोज दिवसभर आणि झोपायच्या आधी चांगले आणि सकारात्मक विचार करा म्हणजे स्वप्नेही चांगली पडतील .हे सांगण्यासाठी हा प्रपंच.

Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...