ब्लॉग नं: 2025/36 7 . दिनांक:31 डिसेंबर ,2025. मित्रांनो , हिवाळा आला की,शरीरावर त्याचा काही ना काही परिणाम म्हणण्यापेक्षा दुष्परिणाम दिसून येतो.जसे की, हिवाळ्यात त्वचा ओठांजवळ काळवंडते, त्वचा ताणली जाते आणि झोंबते. त्वचा पांढरी पडते आणि त्वचेला खाज सुटणे वगैरे. यावर वेळीच उपाय करा , नाहीतर हा त्रास वाढू शकतो…ओठांवरील त्वचा काळी कां पडते, हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सविस्तर: हिवाळा आला की अनेक जणांना एक समान त्रास जाणवतो.ओठांच्या बाजूची त्वचा कोरडी पडणे , तोंड उघडताना आग होणे , त्वचा ताणल्यानंतर ती झोंबणे , कधी भेगा पडणे आणि हळूहळू तो भाग काळपट होणे. सुरुवातीला हा त्रास किरकोळ वाटतो , पण वेळेवर लक्ष दिले नाही तर तो दीर्घकाळ टिकणारा आणि चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवणारा ठरू शकतो.हा त्रास फक्त बाहेरील हवामानामुळे होतो असे नाही ; अनेकदा त्यामागे शरीरातील अंतर्गत असंतुलनही कारणीभूत असते. हा त्रास नेमका का होतो ? 1) त्वचेतील ओलावा कमी होणे: थंड व कोरडी हवा , वारंवार गरम पाण्याने चेहरा धुणे , जास्त फेसाळ किंवा कठोर साबणांचा वापर यामुळे त्वचेत...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .