ब्लॉग नं. 2024/30 6 दिनांक:- 16 डिसेंबर , 2024. मित्रांनो , मराठीमध्ये एक म्हण आहे, “आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं.” काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांना एक सवय आहे,म्हणण्यापेक्षा खोड आहे,जुन्या जुन्या गोष्टी उकरून काढून ते असं झालं असतं तर तसं झालं नसतं,अशी विधान करून ते चर्चेत राहतात.इतक्यात त्यांनी असेच एक विधान केले आहे,आजच्या ब्लॉगमध्ये त्यावर चर्चा करूया. सविस्तर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे की, 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल , ज्यात भाजपने सत्ता मिळवली होती , कॉंग्रेसने UPA- 2 सरकारच्या काळात, प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान बनवले असते आणि डॉ. मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती बनवले असते,तर कदाचित चित्र वेगळे असते. त्यांच्या ' अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स ' या नवीन पुस्तकावर चर्चा करताना त्यांनी हे मत व्यक्त केले...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .