Blog No.2024/021. Date: -30 th , January,2024. मित्रांनो, आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची 76 वी पुण्यतिथि.मी ब्लॉग लिहितांना राजकारणी लोकांना टाळायचं हा माझा निर्णय कटाक्षाने पाळतो. पण महात्मा गांधीं हे केवळ राजकारणी नव्हते.ते एक थोर स्वातंत्र्य सेनानी होते.त्यामुळे त्यांची ओळख ही राजकारणी अशी नाहीच.त्यांच्यावर लोक कितीही टीका करोत त्यांचे स्वतंत्रता आंदोलनातील योगदान उल्लेखनीय होते,हे निश्चित. सविस्तर आजकाल आपल्या नेत्यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत किंवा विचारांची लढाई हे खूप वेळा ऐकायला मिळते.पण ठळकपणे मांडता येतील असे महात्मा गांधी यांचे विचार होते. Gandhian Thoughts हा विषय सेवाग्रामच्या मेडिकल कॉलेजमधे अॅडमिशन मिळविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या पीएमटीमध्ये असायचा. असायचा यासाठी लिहिले कारण आताचे मला माहित नाही. पण पूर्वी होता. ...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .