ब्लॉग नं. 2026/ 237. दिनांक: 25 ऑगस्ट, 2026. व्यथांच्या कथा 2 — शिक्षण संपलं , पण प्रश्न संपले नाहीत! मित्रांनो, कॉलेज संपलं , पण परीक्षा संपत नाही.कॉलेजच्या जीवनावर आधारित “इम्तेहान” हा विनोद खन्नाचा चित्रपट आठवतोय. “इम्तेहान” म्हणजे परीक्षाच, जीवनाची परीक्षा,संघर्ष सुरू होतो,नोकरी मिळविण्यासाठी.कधी अपयश पदरी पडतं. पण खचून जायचं नसतं. मला अशा वेळी नेमकं आठवायचं, या “इम्तेहान” मधलं किशोरकुमारचं गाणं, “रुक जाना नही,तु कभी हारके, कांटोपे चलके मिलेंगे साये बहारके”. अतिशय अर्थपूर्ण आणि भावपूर्ण गीत. ही गाणी आपल्याला बरंच काही शिकवून जातात. शाळेत दाखल झाल्यापासून मुलांच्या मागे परीक्षा लागतात. शाळा संपली , कॉलेज संपलं , पदवी हातात आली की, तरुणांच्या आयुष्यातला संघर्ष संपतो , असं आपल्याला वाटतं. पण खरं तर तिथूनच,एका वेगळ्या संघर्षाची सुरुवात होते. “ आता पुढे काय ?” हा प्रश्न अ...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .