ब्लॉग नं. 2026/090. दिनांक: 31 मार्च,2026. मित्रांनो, पाणी किती प्यावे ? 8 ग्लासचा नियम की शरीराचा संकेत: जाणून घ्या हायड्रेशनमागचे सत्य आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट वारंवार सांगितली जाते, "दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यायलाच हवे." मग तहान लागलेली असो वा नसो , आपण बाटलीमागून बाटली रिकामी करत असतो.पण तुम्हाला माहीत आहे का ? हा ' 8 ग्लासचा नियम ' कोणत्याही अधिकृत वैद्यकीय संस्थेने दिलेला नाही. हायड्रेशन नक्की कसे काम करते आणि आपण कुठे चुकतोय , हे समजून घेणे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.यासाठी आजचा ब्लॉग. सविस्तर: 1 . 8 ग्लास पाण्याचा नियम: तथ्य की समज ? जागतिक आरोग्य संघटना ( WHO) किंवा ICMR सारख्या संस्थांनी,8 ग्लास पाण्याचा कोणताही सार्वत्रिक नियम बनवलेला नाही. सीके बिर्ला हॉस्पिटल्सचे डॉ. शील भद्रा जैन यांच्या मते , पाण्याची गरज प्रत्येकासाठी वेगळी असते. उदाहरणादाखल: मे महिन्यात नागपुरात उन्हात काम करणाऱ्या मजुराची पाण्याची गरज आणि मुंबईत एसी ऑफिसमध्ये बसणाऱ्या व्यक्तीची गरज कधीच सारखी असू शकत नाही. 2 . केवळ पाणीच नाही , तर ' हे '...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .