ब्लॉग नं. 2026/ 244. दिनांक: 1 सप्टेंबर, 2026. मित्रांनो , उच्च कोलेस्ट्रॉलला ( High Cholesterol) बऱ्याचदा ' सायलेंट किलर ' (Silent Killer) म्हटले जाते. कारण शरीरात एलडीएल ( LDL) किंवा वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यावर , अनेक वर्षे कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत आणि आतून रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक ( Plaque) साचत राहतो. परंतु , हृदयविकाराचा झटका किंवा इतर गंभीर समस्या येण्याआधी आपले शरीर काही बारीक-सारिक संकेत देत असते.हाय - कोलेस्ट्रॉल हृदयापर्यंत पोहोचण्यापूर्वी शरीरावर जे 7 संकेत दिसतात , ते जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: वैद्यकीय तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते , शरीरावर किंवा दैनंदिन हालचालींमध्ये दिसणारे 7 भौतिक संकेत जर वेळीच ओळखले , तर होणारा मोठा धोका टळू शकतो. शरीरावर दिसणारे हे 7 महत्त्वाचे संकेत खालील प्रमाणे; 1 .डोळ्यांच्या आजूबाजूला पिवळसर पुरळ/गाठी ( Xanthelasma) : डोळ्यांच्या पापण्यांवर किंवा त्याच्या आसपासच्या त्वचेवर , फिकट पिवळ्या रंगाचे छोटे सुजलेले डाग किंवा मऊ गाठी दिसू लागतात. हे त्वचेखाली अतिरिक्त कोलेस्ट्रॉल जमा झाल्याचे थे...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .