Blog No.2023/27 5 Date:- 3 1 th ,October 2023. मित्रांनो, काल परवा मी कराडला गेलो होतो. परवा मराठी साहित्य मंडळ, ठाणे यांच्या तर्फे कराड येथील यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीत माझ्या “चित्र आणि चेहरा” या कथा संग्रहासाठी माझा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.29 तारखेला सकाळी 10 चा कार्यक्रम होता.मला पुण्याहून 10 पर्यन्त कराडला पोहोचता येणार नाही,म्हणून 28 ऑक्टोबरला आम्ही कराडला गेलो.शनिवारी नृसिंहवाडी आणि खिद्रापुरला जाऊन दर्शन घ्यायचे ठरविले. त्याप्रमाणे श्री दत्तगुरूंच्या दर्शनानंतर आम्ही संध्याकाळी 5 च्या सुमारास खिद्रापुरकडे निघालो.कोजागिरी पौर्णिमेचा दिवस त्यामुळे सूर्य मावळल्यानंतर ही चंद्राच्या प्रकाशाची सोबत होती. त्यामुळे खिद्रापूरचे सौन्दर्य आधी सूर्य प्रकाशात न्याहाळले होते आता चंद्रप्रकाशात ही बघण्याचा आनंद घेऊ ही कल्पना. खिद्रापूर एक धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळ ...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .