Skip to main content

Posts

Showing posts with the label spiritual

Select your Language

लोकशाहीपुढील आव्हाने

ब्लाॅग नं. 2026/227 . दिनांकः 15 ऑगस्ट, 2026. मित्रांनो , आज भारताचा 80 वा स्वतंत्रता दिवस आपण साजरा करत आहोत. यानिमित्त आपणा सर्वास खूप खूप शुभेच्छा. आजच्या या ब्लॉगमधून, आपण या गोष्टीची चर्चा करणार आहोत की, देशापुढील आव्हाने कुठली आणि लोकशाही पुढील आव्हाने कुठली आहेत. सविस्तरः संसदेचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपल. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी, म्हणजेच खासदार, हे आपल्या तर्फे आपल्या मतदारसंघातील किंवा देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न, संसदेच्या अधिवेशनात मांडत असतात. या प्रश्नांची सरकारकडून उत्तर मागितली जातात. या अर्थाने संसदेचे अधिवेशन ही एक प्रकारे सरकारची परीक्षा असते. दैनंदिन कामकाजातून जे प्रश्न मार्गी लागत नाहीत, ते लोकहिताचे आणि देशहिताचे प्रश्न मार्गी लावण्याचे कार्य, संसदेच्या अधिवेशनातून होत असतं किंवा व्हायला पाहिजे अशी अपेक्षा असते. पण पावसाळी अधिवेशनात, संसदेच्या प्रत्येक सभागृहाचं म्हणजेच लोकसभेचे 114 तास आणि राज्यसभेचे प्रत्ये 114 तास.असे एकूण 228 तास एवढे काम होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मात्र लोकसभेचे 17 तास आणि राज्यसभेचे 38 तास असे एकूण 55 तास ए...

मी, वासना किंवा इच्छा आणि सुख

  ब्लॉग नं. 2026/09 5 . दिनांक: 5 एप्रिल,2026. मित्रांनो,             कधी कधी जीवनांत अगदी छोट्या छोट्या गोष्टी,आपल्याला खूप काही शिकवून जातात. आपल्या जे लक्षात आलेलं नसतं,ते अगदी छोट्या वाक्यातून कळतं. इंडिपेंडेंट हे इंग्लंडमधून प्रसारित होणारं, एक वर्तमानपत्र आहे.ज्यात मी आज ही पोस्ट वाचली. I want happiness या तीन शब्दावर आधारित ही पोस्ट आहे. मला वाटलं की, यावर अजून वाढवून किंवा विस्तार करून, काही लिहावं असं मला वाटलं, म्हणून हा आजचा ब्लॉग. सविस्तर: आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अंतिम ध्येय काय असतं ? तर ते असतं, ‘सुख’ किंवा ' आनंद '. पण गंमत अशी की , आपण जितका आनंदाचा पाठलाग करतो , तितकाच तो आपल्यापासून लांब जातोय असं वाटतं. खरा आनंद हवाय ? मग आधी ' मी ' आणि ' हव्यास ' सोडा! गौतम बुद्धांच्या आयुष्यातील एक छोटीशी पण डोळे उघडणारी गोष्ट याचं नेमकं कारण सांगते.ती प्रसिद्ध घटना सांगतो.   एका माणसाने भगवान बुद्धांकडे जाऊन अतिशय साधेपणाने आपली इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला , “ मला आनंद हवा आहे.” ( I want happines...