Blog No. 2023/16 7 Date: 1st, July 2023. मित्रांनो, आज 1 जुलै, म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याचा महिना.31 जुलै ही शेवटची तारीख आहे. रिटर्न स्वतः फाइल करीत असाल तर सोबत फॉर्म 16, टीडीएस सर्टिफिकेट, जर शेअर्समधे गुंतवणूक केलेली असेल आणि शेअरची विक्री केली असेल तर, कॅपिटल गेन्स सर्टिफिकेट, म्यूचुअल फंड विक्री केली असेल तर त्याचे सर्टिफिकेट सोबत ठेवा.तसेच इन्कम टॅक्स च्या साइटवरुन Annual Information Statement ( AIS ) आणि Taxpayer Information Statement ( TIS ) डाउनलोड करुन ठेवा. TIS open करण्यासाठी तुमचा PAN no small characters मधे आणि त्यानंतर तुमची जन्मतारीख जर 01011965 असेल तर ती लिहून उघडता येईल. abcda1234f01011965 हा पासवर्ड टाकावा लागेल. तुमचे या वर्षात केलेले सर्व व्यवहार TIS मधे तुम्हाला दिसतील. स्वतःचे रिटर्न स्वतःच फाइल करा. ITR form कुठला निवडाल? ...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .