ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
एक अनोखी सहल हे नांव का दिले म्हणालं तर आम्ही तिघे त्यानंतर कुठेच गेलो नाही आणि अशा प्रकारची सहल नंतर कधीच अनुभवली नाही. अनेक दृष्टीने ती अनोखी होती.
तर ठरल्या प्रमाणे आम्ही निघालो होतो. रस्त्यात एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो आणि पुढे निघालो. 11.30 ते 12.00 च्या दरम्यान आम्ही गडचिरोलीला पोहोचलो. गडचिरोली गावाबध्दल आणि नावाबध्दल कुतूहुल होतं. गडचिरोली जिल्हा निर्मिती च्या आधी चंद्रपूर हा आकाराने महाराष्ट्रातील सगळ्यांत मोठा जिल्हा होता. चंद्रपूर हा दुर्गम आणि मागासलेला जिल्हा होता. जास्तीतजास्त भुभाग हा जंगलाने व्यापला असल्याने आणि रस्ते आणि वाहतुकीची साधनेही नव्हती. म्हणून 1982 ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले होते आणि गडचिरोली ला गडचिरोली जिल्ह्याचे ठिकाण घोषित करण्यात आले होते. आता या गोष्टीला 25 वर्षावर झाले होती. शहर तस नविनच वाटत होतं. मागास भागाची लक्षणं शहरांत जाणवत नव्हती. मोटार सायकल चे , मारूतीचे शोरूम . दुमजली ईमारती. जिल्हाधिकारी कार्यालयाची बिल्डिंग नवीच होती. बरीच स्वच्छताही होती रस्त्यांवर. हाॅटेल साधेच होते. पण जेवण छान होतं आणि थोडी वेगळी चव होती. ती सगळ्यानाच आवडली. त्यानंतर डाॅक्टरांच्या प्रस्तावित काॅलेजची जागा बघण्यासाठी जायचं होत.तिथून 10 कि मी दूरवर म्हणजे गडचिरोली-धानोरा रस्त्यावर चाटगांव येथे जायचे होते. त्याप्रमाणे आम्ही अर्ध्या तासात तिथे पोहोचलो. तिथे पुर्ण जंगलच होते. सागवानाच्या झाडामधून फोटोसेशन झालं तिन्ही कपल्सचं. अनोखी सफर याही दृष्टीने होती. आम्ही तिघेही पहिल्यांदाच मुलांना सोबत न घेता दोघेच ट्रीपवर निघालो होतो. चातगांवहून गडचिरोली कडे निघालो होतो. हेमलकसा आणि भामरागड साठी पोलिस खात्याकडे परवानगी घ्यावी लागत असे कारण नक्षलवादी चळवळ मोठ्या प्रमाणांत कार्यरत होती.डाॅक्टरांनी तसा अर्ज केला असल्याचे सांगितले . परवानगी बध्दल मेसेज आला नव्हता. डाॅक्टर म्हणाले हेमलकसाला जास्त वेळ मिळावा म्हणून आपण आलापल्लीला जाऊन रात्रीचा मुक्काम करू. अहेरी तिथून जवळच आहे. तिथूनच परमिशनचे कळेल. आम्ही गडचिरोलीहून निघालो. 3 साडेतीन तासाचा प्रवास. साधारणतः डिसेंबर जानेवारी चा महिना . सगळीकडे हिरवगार होत. आजूबाजूच्या सुंदर निसर्गरम्य वातावरणामुळे सकाळ पासून निघालेलो असूनही थकवा जाणवत नव्हता. एव्हाना गप्पांचा स्टाॅक संपल्याने महिला मंडळही निसर्गाचा आनंद घेत होतं. झाडांचे विविध आकार. हिरवा या रंगाच्याच वेगवेगळ्या छटा बघायला मिळाल्या. एका ठिकाणी रस्त्यावरूनच पाण्याचा ओहोळ वहात होता. सगळ्यांची पाण्यात पाय बुडवायची ईच्छा दिसली तर गाडी थोडी थांबावायला सांगितली. पाणी खुप स्वच्छ होत . खुप थंडही होत.खुप छान वाटलं. अहेरी आलं. बरीच गर्दी होती अहेरीत , बहुदा आठवडी बाजार असावा. पोलीस स्टेशन समोर गाडी थांबली. डाॅक्टर पोलिस स्टेशन मध्ये गेले. तेवढ्या वेळांत आम्ही गरमगरम चहा आणि खाद्य पदार्थावर ताव मारला. टपरीवरचा चहा आणि गरमागरम भजे याची सर कशालाच येत नाही. तेवढ्यात डाॅक्टर आले. परवानगीचे अजूनही काही कळले नव्हते. मग ठरल्याप्रमाणे आम्ही अहेरीहून आलापल्लीकडे निघालो. 15-20 मिनीटाचे अंतर होते. 7 कि मी च्या रस्त्यात बर्याच लहान मोठ्या फांद्या टाकलेल्या होत्या. ड्रायव्हरने खाली उतरून बाजूला केल्या . मी ड्रायव्हरच्या बाजूला बसून होतो. म्हणून मी कुतूहुल म्हणून विचारले तर जागेवर पोहोचल्यावर सांगतो म्हणाला. ते नक्षलवाद्यांचे कृत्य असल्याचे कळले. असे नेहमीच चालत म्हणाला. आलापल्ली पुर्ण जंगलातच होते. विशेष मोठ गांव नव्हतं. संध्याकाळी 7 लाच सगळी दुकाने बंद झालेली दिसली. चहाची टपरी सुरू होती. तिथे चहा घेतला आणि डाॅ साहेबांच्या बहिणीच्या घरी पोहोचलो. छोटेखानी घर , बाहेर थोडा बगीचा होता. तिथे गप्पा झाल्या. नक्षलवादी येतात का ईथे असे अजयने विचारल्यावर बहिणीचा मुलगा म्हणाला आपण चहा प्यायलो तिथे असतात. एव्हाना तुमच्या बध्दल त्यांनी सगळी माहिती घेतली असणार.असही तो म्हणाला .माणसासारखी माणस हो ती कशी ओळखायला येणार.
क्रमशः. . . ....... ...... .
Comments
Post a Comment