ब्लॉग नं. 2024/28 9 दिनांक:- 30 नोव्हेंबर, 2024. मित्रांनो, नुकतीच तुम्ही पॅन कार्ड संबंधात न्यूजपेपर आणि समाज माध्यमातून आलेली माहिती वाचली असेल.केंद्रीय मंत्रिमंडळाने पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे , ज्यामुळे विद्यमान कायम खाते क्रमांक ( Permanent Account Number - PAN) प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहेत. हा प्रकल्प करदात्यांच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासोबतच भारतातील व्यावसायिक प्रक्रियांना सुलभ करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सविस्तर: पॅन 2.0 चे नवे वैशिष्ट्ये: या प्रकल्पांतर्गत पॅन कार्डमध्ये आता QR कोडचा समावेश करण्यात येईल , हे कार्ड सर्व करदात्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिले जाईल.या संबंधात पुढे बोलतांना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की , पॅन 2.0 हे सर्व शासकीय यंत्रणांसाठी एकत्रित व्यवसाय ओळखपत्र ( Unified Business Identifier) म्हणून कार्य करेल आणि नियामक गरजा सुलभ करेल. वर्तमान पॅन कार्ड्सची वैधता: QR कोड नसलेल्या वर्तमान पॅन कार्ड्सच्या वैधतेबद्दल चिंता व्यक्त केली गेली आहे. अशा पॅन क...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .