ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
ब्लॉग नं: 2025/177. दिनांक: 27 जून , 2025. मित्रांनो , मानवी शरीर ही एक विस्मयकारक रचना आहे , जी भौतिक आणि अभौतिक घटकांना एकत्र गुंफून ठेवते. प्रत्येक घटकाला स्वतःचे महत्त्वाचे कार्य आणि जबाबदाऱ्या आहेत.त्यात मेंदू आणि मन यांचा सहभाग आपले संपूर्ण जीवन व्यापून टाकतो.हे दोघे वेग वेगळे असूनही एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत , आणि मानवी विचार , स्मृती , भावना आणि आरोग्यावर महत्त्वाचा परिणाम करतात.आजचा ब्लॉग या विषयावर आहे. सविस्तर: मेंदू हा शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे. मेंदू हा एक भौतिक अवयव आहे , जो कवटीमध्ये सुरक्षितपणे ठेवलेला असतो.अब्जावधी न्यूरॉन्सच्या नेटवर्कद्वारे मेंदू हालचाली , भावना , आणि संज्ञानात्मक कार्ये , जसे की शिकणे आणि स्मृती , यासह इतर गोष्टींचे नियंत्रण करतो.मेंदू हा प्रामुख्याने तीन भागात विभागला आहे. मेंदूचे मुख्य भाग: सेरेब्रम: हा भाग विचार प्रक्रिया , स्मृती , भाषा यावर नियंत्रण ठेवतो. सेरेबेलम: हा भाग हालचालींचे समन्वय साधतो. ब्रेनस्टेम: हा भाग हृदयाचे ठोके आणि श्वसन यांसारखी स्वायत्त कार्ये नियंत्रित करतो. मेंदू एकूण शारीरिक आणि मानसिक प्...