Blog No.2024/001. Date: -1st, January,2024. मित्रांनो, सर्व प्रथम आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे वर्ष तुम्हा सर्वांना सुखसमृद्धीचे,आरोग्याचे आणि भरभराटीचे जाओ,हीच शुभेच्छा. इंग्लिश नवीन वर्ष वगैरे उगीच शब्दच्छल करण्यात काहीच अर्थ नाही.जेंव्हा सर्व व्यवहार या वर्षाप्रमाणेच केले जातात.असो. भारतीय सिनेसृष्टीत आपल्या वेगळ्या अभिनय शैलीसाठी प्रसिद्ध असलेले नाना पाटेकर यांचा आज जन्मदिवस,नाना 73 वर्षाचे झालेत. एक भारतीय अभिनेता , पटकथा लेखक , चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक असलेले नाना पटेकर भारतीय प्रादेशिक सैन्याचे माजी अधिकारी आहेत.त्यांनी प्रामुख्याने हिन्दी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. नाना पाटेकर यांचे खरे नांव विश्वनाथ पाटेकर. पाटेकर यांना त्यांच्या अभिनयासाठी तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार , चार फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन फिल्मफेअ...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .