ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
ब्लॉग नं. 2025/245. दिनांक : 3 सप्टेंबर 2025 मित्रांनो , 💳 CIBIL स्कोअर: तुमच्या आर्थिक आरोग्याचा आरसा आजच्या काळात कार कर्ज , गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घ्यायचं झालं तर बँक किंवा वित्तीय संस्था सर्वात आधी एकच गोष्ट पाहते,तो म्हणजे तुमचा अर्थात, CIBIL Credit Information Bureo Of India Limited चा स्कोअर पहाते.तुम्हाला कर्ज द्यायचे किंवा नाही,हे याच सिबिल स्कोरवर अवलंबून असते आणि व्याजाच्या दरात काही सूट मिळेल कां. हे देखिल सिबिल स्कोरवरून ठरते.हा स्कोअर म्हणजे तुमच्या कर्ज फेडण्याच्या शिस्तीचा आणि जबाबदार वर्तनाचा पुरावा.आजच्या या ब्लॉगमध्ये आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. सविस्तर: 📊 CIBIL स्कोअर म्हणजे काय ? CIBIL स्कोअर हा 0 ते 900 या दरम्यान असतो. 700 वरील स्कोअर चांगला मानला जातो. 800 वरील स्कोअर सर्वात उत्कृष्ट मानला जातो.जास्त स्कोअर म्हणजे कर्ज मंजूर होण्याची शक्यता जास्त , तसेच कमी व्याजदरावर कर्ज मिळण्याची संधी. 📑 तुमचा CIBIL अहवाल काय सांगतो ? CIBIL अहवाल हा तुमच्या क्रेड...