Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी


Blog No. 2023/45        

Date: 21st, February 2023







  

मित्रांनो,

           कल्पना करा तुम्ही पुण्यात रहात आहात.बाणेरला तुमचे घर आहे आणि तुम्हाला ऑफिसला हडपसरला जायचे आहे. तुम्हाला हडपसरला पोहोचायला कमीतकमी सव्वा तास वेळ लागणार हे निश्चित.हे गुगल मॅप वरुन  सांगतो आहे.पण काही दिवसांनी किंवा महिन्यांनी हेच अंतर तुम्ही 15 मिनिटांत पार करू शकाल.असे मी तुम्हाला सांगितले तर  तुमचा विश्वास बसणार नाही,बरोबर ना.पण मित्रांनो बंगळुरु मधील एरो इंडिया शोमधे ईप्लेन कंपनीच्या नॉन-फ्लाइंग प्रोटोटाइप मॉडेलने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.ही एक इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी आहे.

 

ई-प्लेन कंपनीचे उद्दिष्ट

            आयआयटी मद्रास येथे इनकुबेटेड ईप्लेन कंपनीची स्थापना प्राध्यापक सत्य चक्रवर्ती यांनी केली आहे. त्यांनी रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि त्यामुळे प्रवासास लागणारा वेळ कमी करण्याचे उद्देश्यातून काम करण्यास सुरुवात केली.शहरांतर्गत प्रवास आणि मालवाहतूक जलद करण्यासाठी त्यांनी ईप्लेन-ई-200 हे मॉडेल डिझाईन केले आहे. ही भारतातील पहिली कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी असेल. ही टॅक्सी एकदा पूर्ण चार्ज झाली की 200 किमी एवढी धावू शकेल. ही कॅब सारख्या रोडवर धावणाऱ्या वाहनापेक्षा 10 पट अधिक वेगवान आहे. ह्या टॅक्सीची स्पीड ही 160 किमी/प्रतितास ते 200 किमी/प्रतितास एवढी असेल. ह्या टॅक्सीत ड्रायवर आणि दोन माणसे किंवा ड्रायवर आणि 200 किलो वजनाचे सामान वाहून नेता येईल.लोकांना हे अर्बन एयर मोबीलिटी वाहन सुरक्षित आणि शाश्वत उड्डाणाचा आनंद देईल.        

 

इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी वाहतुकीचे प्रकार

              इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी वाहतुकीचे  दोन प्रकार असतील.एक माल वाहतूक आणि दूसरा प्रकार दररोज शहरांतर्गत प्रवासी वाहतूक.ह्या विमानाचे डिझाईन आणि प्रोटोटाइपना DGCA अर्थात Director General of Civil Aviation  ची मान्यता मिळवावी लागेल. 2024-25 पावेतो DGCA ची मान्यता मिळेल आणि बंगळुरु मधे  ई-फ्लाइंग टॅक्सी सुरू केली जाण्याची शक्यता आहे. असे मत कंपनीचे संस्थापक विष्णु रामकृष्णन यांनी व्यक्त केले. ही टॅक्सी पारंपरिक हेलिकॉप्टरपेक्षा चांगली आहे असे देखिल विष्णु रामकृष्णन म्हणाले.कारण हेलिकॉप्टर साठी हेलीपॅड लागते पण ही टॅक्सी अपार्टमेंटच्या छतावरून किंवा 1600 चौरस फुट एवढ्या मोकळ्या जागेत टेक ऑफ करु शकेल.ही टॅक्सी बॅटरीवर चालत असल्याने हिचे भाडे देखिल कमी असेल.तथापि, भविष्यात स्वायत्त तंत्रज्ञान देण्याचा स्टार्टअपचा मानस आहे. तथापि, एरो इंडिया शोमध्ये फ्लाइंग टॅक्सी कृतीत दाखवली गेली नाही. कंपनी e200 साठी एका बॅटरी चार्जवर 10 ते 15 किमी (जवळपास 10 मैलांपर्यंत) सुमारे 10 छोट्या ट्रिप करण्याचे लक्ष्य ठेवत आहे. 

        परदेशात ह्या दृष्टीने नवनवीन स्टार्ट अप्स इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सीचे उत्पादनाच्या क्षेत्रात उतरल्या आहेत. यूनायटेड एयरलाइन्सने 500 फ्लाइंग टॅक्सीची ऑर्डर सुद्धा निर्मात्यांना देऊन टाकली आहे.

                आता काही प्रश्न माझ्या मनांत उभे ठाकले आहेत. ते तुमच्या देखिल मनांत उभे ठाकले आहेत. ते असे :-

         1. ह्या टॅक्सीची किंमत बरीच जास्त असेल तर ती विकत कोण घेईल? ह्याचे उत्तर असे असू शकेल की ह्यात देशांतर्गत हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्या ह्या टॅक्सी  विकत घेतील आणि चालवायला देतील. 

      2.ड्रायवर म्हणजे पायलटला ती टॅक्सी चालवायचे विशेष प्रशिक्षण घ्यावे लागेल. त्यातील प्रशिक्षण संस्था लागतील कां?   

       3.त्या टॅक्सीचा मार्ग कसा असेल म्हणजे एरिएल रुट असेल की रोडच्या वरुनच जाईल. हे मार्ग कोण निर्धारित करेल. 

      4. ह्या टॅक्सीचा काही कुणी ट्राफिक कंट्रोलर असेल कां? कारण ही टॅक्सी 457 मिटर एवढ्या उंचीपर्यंत उड्डाण करु शकेल.

     5.त्यां टॅक्सीच्या बॅटरी दर 200 किमी नंतर चार्ज कराव्या लागतील. त्यामुळे त्यासाठी वेगळे चार्जिंग स्टेशन लागतील. 

          अर्थात ही टॅक्सी जेव्हा प्रत्यक्षात येईल त्यावेळी सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतीलच.हे सारे प्रत्यक्षात उतरले तर ट्राफिक जाम फ्री बंगळुरु,पुणे,हैदराबाद पहायला मिळेल. ही कंपनी त्यांचे स्वप्न लवकर पूर्ण करो.अशी आशा करु या.        


       

  

                          प्रसाद नातु,पुणे  


              

                

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...