Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

UFO किंवा उडती तबकडी

 Blog No. 2023/40     

Date: 17th, February 2023.


मित्रांनो,

            उत्तर अमेरिकेत एक आठवड्यात अमेरिकेने एक चीनी गुप्तहेर बलून आणि तीन अज्ञात उडणाऱ्य वस्तु पाडल्यानंतर दोन्ही राष्ट्रात तनाव वाढला आहे. याबाबत असे म्हटले जाते की अमेरिकन अधिकारी चिनी सैन्याने सोडलेल्या गुप्तहेर बलूनवर अगदी बारकाईने पाळत ठेवून होते. अमेरिकन अधिकाऱ्याने एका मुलाखतीमधे  सांगितले की अमेरिकेने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दक्षिण चीन मधील हैनान बेटापासून निघालेल्या चीनच्या एका स्पाय बलूनचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. ते अलास्का जवळील अलेउटीयन बेटावरून पुढे सरकले नंतर कॅनडा आणि मोंटाना मार्गे पुढे निघाले. त्या नंतर लष्करी नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना सावध केले. अमेरिकन हवाईदलाने जवळजवळ त्याच प्रकारचे हवाई क्राफ्ट टेक्सास आणि फ्लोरिडा च्या अंतराळात दोनदा शोधून काढले होते. 4 फेब्रुवारी ला अमेरिकन फायटर जेटने दक्षिण कॅरोलिनाच्या किनाऱ्यावर हा फुगा खाली पाडला. त्यातील महत्वपूर्ण असे इलेक्ट्रोनिक पार्ट्स आणि सेन्सॉरस जप्त केले. त्या नंतर 10 फेब्रुवारी ला एक UFO अलास्का जवळील समुद्रात पाडले. 11 फेब्रुवारीला आणखी एक UFO कॅनडाच्या सीमेजवळ पाडण्यात आले.12 फेब्रुवारीला मिशीगन जवळील एका तलावात एक UFO पाडण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षा अधिकार्‍यांनी रविवारी वीकेंडला खाली पाडलेल्या वस्तूंचा उगम पृथ्वीबाह्य असण्याची शक्यता नाकारली.पण Genenral Glen D. Van Herck, the commander of the Air Force’s Northern Command  यांनी सांगितले की कुठलीही शक्यता नाकारता येत नाही. 13 फेब्रुवारीला व्हाईट हाऊसच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान तीन अज्ञात उडणाऱ्या वस्तूंनी नागरी हवाई वाहतुकीला  धोका निर्माण केला होता परंतु ते संप्रेषण सिग्नल पाठवत नव्हते.पण त्या तीन UFO मधे कुणी मानव असण्याची शक्यता नाकारली.

 

अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट (UFO)

            अमेरिकेत 4 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान जे काही घडले,त्यामुळे पुनः एकदा अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट (UFO) याला उडती तबकडी देखिल म्हटले जाते. त्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.मित्रांनो, UFO चे सगळ्यात पहिले दर्शन 1947 मधे झाले. वॉशिंग्टन येथील एक व्यापारी केनेथ अरनॉल्ड यांनी वॉशिंग्टन मधील माऊंट रेनियर जवळ नऊ हाय स्पीड ऑब्जेक्टस एक समूह पहिल्याचा दावा केला.आरनॅल्डने त्या तबकड्यांचा वेग तशी हजार मेल असावा असा आनंदाज केला होता.त्या नंतर अज्ञात अशा तबकड्यांचे वारंवार दर्शन होऊ लागल्याच्या वार्ता येऊ लागल्या मुळे अमेरिकेच्या वायुसेनेने Project Sign हे एक ऑपरेशन तबकड्यांचा शोध लावण्यासाठी स्थापन केले. काही संशोधकांनी हे सोविएत रशियाचे कृत्य असावे असे सुचविले तर काहींनी हे इतर जगातील अंतराळ यान असू शकते असे अंदाज वर्तविला. 1952 ते 1969 पर्यन्त Project Blue Book ने 12,000 पेक्षा जास्त दृश्ये आणि घटनांचे अहवाल संकलित केले.अमेरिकेच्या शिवाय कॅनडा मधे UFO दिसल्याच्या नोंदी सापडल्या.पण आज पावेतो UFO खरोखर येते कां? UFO ला पाहिले असे सांगणारे अमेरिकेत बरेच अमेरिकन आहेत. या बाबत Bob Lazar ची Area 51 & Flying Saucers ही Documentary बराच प्रकाश टाकते. पण हे सारे खरे असल्याचा दावा अजून तरी कुणी केलेला नाही.

 



UFO वर आधारित चित्रपटांची निर्मिती

UFO ह्या  संकल्पनेचा उपयोग करुन घेऊन Hollywood ने कित्येक चित्रपट काढले आणि त्यांनी भरपूर धंदा केला. या पैकी काहींची नांवे अशी  Under the skin, Signs, A Space Odyssey, Men in Black, Independence Day, District 9, Close encounters of the Third Kind, E.T. Extra Terrestrial, The Thing, Arrival

आपल्या भारतात Alien आणि UFO वर आधारित पहिला हिंदी चित्रपट म्हणजे “कोई मिल गया” हा राकेश रोशन चा चित्रपट, त्यानंतर पीके, वहाँ के लोग, 9 , रेड रैन यासारखे चित्रपट बनविण्यात आले. “कोई मिल गया” हा चित्रपट अशा प्रकारचा पहिला चित्रपट असल्याने खूप चालला.

 

सारांश:-

            आता पुनः एकदा ह्या विषयावरच्या चर्चेला उधाण आले आहे. UFO हे सारे खरे आहे कां? की जगातील कुण्या देशाचे हे खोडकर कृत्य.कारण शेवटी यातून संदेश देण्याचा प्रयत्न असतो की पृथ्वी संकटात आहे. Bob Lazar ची Area 51 & Flying Saucers ही Documentary तर दाखविते की Project Blue Book च्या टीम मधील लोकांची alien शी भेट झाली. अमेरिकन fighters नी त्या UFO चा पाठलाग केला, पण त्या UFO चा वेग हा 70000 मैल प्रति तास असल्याने त्या पाहताच दिसेनाश्या झाल्या. जग 1945 मधे होते त्यापेक्षा खूप प्रगत झाले आहे.ह्याचा शोध लागेलच.एक तर UFO सापडेल आणि ते सापडले तर ते पृथ्वीवरचे कुणाचे आहे की खरोखर परग्रहावरुन ते येतं,म्हणजे परग्रहावर  मानववस्ती आहे हे सिद्ध होईल किंवा हा खेळ कल्पनांचा आहे हे कळून येईल. तोपर्यंत आपल्याला तरी वाट पहाण्याशिवाय गत्यंतर नाही..             



प्रसाद नातु     

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...