Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

Chandrayan-3

 Blog No.2023/221            

Date:- 23rd, August 2023 

मित्रांनो,

            आपला देश आणि त्यातील राजकारण म्हणजे जगाच्या पाठीवरील आठवे आश्चर्य म्हणावे लागेल. मी असं म्हणतोय याचं कारण ऐकल्यावर तुम्हाला माझे विधान पटेल.भारताने चांद्रयान-3 अवकाशात रवाना केले,त्या दिवशीपासून तो सुद्धा राजकारणाचा विषय झाला आहे. चांद्रयान-3 हा एखाद्या पक्षाचा अभिमानाचा विषय नाही तर देशासाठी अभिमानाचा विषय आहे.पण देशाभिमान नावाची चीज काही शिल्लक असेल तर काही वाटेल ना ! वंदे मातरम हे वंदे मातरम नसून वन डे मातरम म्हणजे फक्त एकच दिवस 15 ऑगस्टला आम्हाला अगदी देशप्रेमाचे भरते येते. यावर्षी एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाने 15 ऑगस्टच्या राष्ट्रीय कार्यकामावर बहिष्कार टाकून इतिहास घडविला.असो येशू ख्रिस्तासारखं म्हणायचं “देवा ते काय करत आहेत त्याची त्यांना कल्पना नाही,देवा तू त्यांना माफ कर.” तर चंद्रयान आज चंद्रावर उतरणार आहे.त्याची उत्कंठा सगळ्यांना लागली आहे. अशा वेळी इस्रोने आज पर्यन्त यानाने कसकशी प्रगती केली याचे विवरण प्रसिद्ध केले आहे. ते मी शेअर करीत आहे.                           

 06 जुलै 2023

14 जुलै 2023 रोजी IST 14:35 वाजता द्वितीय लाँच पॅड, SDSC-SHAR, श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण झाले

07 जुलै 2023

वाहनांच्या विद्युत चाचण्या पूर्ण झाल्या. नागरिकांना येथे नोंदणी करून SDSC-SHAR, श्रीहरीकोटा येथील लॉन्च व्ह्यू गॅलरीतून प्रक्षेपणाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले.

11 जुलै 2023

संपूर्ण प्रक्षेपण तयारी आणि 24 तास चालणाऱ्या प्रक्रियेचे अनुकरण करणारी 'लाँच रिहर्सल' पूर्ण झाली.

14 जुलै 2023

LVM3 M4 या वाहनाने चांद्रयान-3 यशस्वीरित्या कक्षेत प्रक्षेपित केले. चांद्रयान-३ ने आपल्या अचूक कक्षेत चंद्राकडे प्रवास सुरू केला. अंतराळयानाची प्रकृती सामान्य आहे.

15 जुलै 2023

ISTRAC/ISRO, बेंगळुरू येथे पहिली कक्षा वाढवणारी चाचणी (अर्थबाउंड फायरिंग-1) यशस्वीरित्या पार पडली. अंतराळयान आता 41762 किमी x 176 किमी कक्षेत आहे.

17 जुलै 2023

दुसरी कक्षा वाढवण्याची कृती केली. अंतराळयान आता 41603 किमी x 226 किमी कक्षेत आहे.

22 जुलै 2023

चौथी कक्षा वाढवणारी कृती (पृथ्वी-बाउंड पेरीजी फायरिंग) पूर्ण झाली आहे. हे यान आता 71351 किमी x 233  किमी कक्षेत आहे.

25 जुलै 2023

25 जुलै 2023 रोजी ऑर्बिट-रेझिंग मॅन्युव्हर केले गेले. पुढील फायरिंग (ट्रान्सलुनर इंजेक्शन), 1 ऑगस्ट 2023 रोजी नियोजित आहे.

05 ऑगस्ट 2023

चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या समाविष्ट करण्यात आले आहे. साध्य केलेली कक्षा 164 किमी x 18074 किमी आहे.

06 ऑगस्ट 2023

LBN#2 यशस्वीरित्या पूर्ण झाले. स्पेसकाफ्ट चंद्राभोवती 170 किमी x 4313 किमी कक्षेत आहे

चांद्रयान-3 व्हिडिओ: चंद्र, चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना चांद्रयान-3 ने पाहिलेला

09 ऑगस्ट 2023

9 ऑगस्ट 2023 रोजी केलेल्या चांद्रयान-3 ची कक्षा 174 किमी x 1437 किमी इतकी कमी झाली आहे.

14 ऑगस्ट 2023

मोहीम कक्षा परिभ्रमण टप्प्यात आहे. अंतराळयान 151 किमी x 179 किमी कक्षेत आहे

16 ऑगस्ट 2023

16 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या फायरिंगनंतर हे यान 153 किमी x 163 किमीच्या कक्षेत आहे.

17 ऑगस्ट 2023

लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे केले गेले आहे. 18 ऑगस्ट 2023 साठी डीबूस्टिंग नियोजित आहे

19 ऑगस्ट 2023

लँडर मॉड्यूल चंद्राभोवती 113 किमी x 157 किमी कक्षेत आहे. दुसरे डी-बूस्टिंग 20 ऑगस्ट 2023 साठी नियोजित आहे

20 ऑगस्ट 2023

लँडर मॉड्यूल 25 किमी x 134 किमी कक्षेत आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी सुमारे 1745 तासांनी पॉवर्ड डिसेंट सुरू होणे अपेक्षित आहे. IST

LVM3-M4-चांद्रयान-3 मिशन:

सॉफ्ट-लँडिंगचे थेट प्रक्षेपण 17:20 वाजता सुरू होते. 23 ऑगस्ट 2023 रोजी IST



 सारांश

            मित्रांनो,आपण आपल्या शास्त्रज्ञानी घेतलेली मेहेनत फळास येऊ दे अशी कामना करू या.135 कोटी भारतीयांना जर अशी कामना केली तरी चांद्रयान 3 आज चंद्रावर सुरक्षित लॅंडींग करेल.आणि आपला भारत देश त्या विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल ज्याची आपण कित्येक वर्षापासून वाट पाहतो आहे.

            आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 प्रसाद नातु,पुणे

 

Comments

  1. Sir, we always lacked common civic sense and basic discipline in social Behaviour. Our patriotism index if measured will be pathetically dismal. We have no basic civic sense to say the least. There is a urgent need of governance in this area, else the effects of progress will be nullified to great extent.
    Excuse me for moving away from Chandrayan-3 topic. It's a matter of pride for our country and the event is important to every Indian. Every Indian must watch and aware about Chandrayan- 3. Superb blog.
    I am very excited about the event and some of the videos in the social media took me back to my college days and refreshed me about Concepts in Maths and Physics about Satelites, Cartesian principles, newtons laws, space dynamics etc

    ReplyDelete
  2. Bharat Mata ki Jai. 🇮🇳🇮🇳🇮🇳

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...