ब्लॉग नं. 2026/08 2 दिनांक: 23 मार्च , 2026. मित्रांनो मधुमेह आणि आवळा: रक्तातील साखर नियंत्रित करणारे एक नैसर्गिक ' सुपरफूड ' आजच्या धावपळीच्या युगात ' मधुमेह ' (Diabetes) हा जीवनशैलीशी संबंधित,एक अत्यंत वेगाने पसरणारा आजार बनला आहे.चुकीच्या खाण्याच्या सवयी , मानसिक ताण , लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव,ही यामागची प्रमुख कारणे आहेत. मधुमेह केवळ रक्तातील साखरेवरच परिणाम करत नाही , तर तो हळूहळू डोळे , किडनी , हृदय आणि मज्जातंतूंवरही विपरीत परिणाम करू शकतो.चला सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर: अशा परिस्थितीत , औषधांसोबतच ' काय खावे आणि काय टाळावे ' हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा मधुमेही रुग्ण फळे खाण्यास घाबरतात , परंतु निसर्गामध्ये असे एक ' सुपरफूड ' उपलब्ध आहे जे साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यास मदत करते— ते म्हणजे ' आवळा ' . आवळा: पोषकतत्त्वांचा खजिना : आवळ्याला ' इंडियन गूसबेरी ' असेही म्हणतात.अनेकांना वाटते की आवळा आंबट असल्याने तो हानिकारक ठरेल , पण सत्य याच्या उलट आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी , फा...
Blog No.2024/014. Date: -19 th , January,2024. मित्रांनो, भारतातील श्रीमंत लोकांमध्ये भर पडत आहे आणि मुख्य म्हणजे त्यात नवश्रीमंताची संख्या अधिक आहे.आपल्या देशातील लोकांचा हॅचबॅक म्हणजे अगदी प्रायमरी कार,त्यानंतर मोडणारी म्हणजे सेडान यापेक्षा सध्या लोकांचा एसयुव्ही म्हणजे मोठ्या गाड्या,उंची कार खरेदी करण्यामागचा कल हेच दर्शवितो.या संबंधात आपण आज चर्चा करणार आहोत. प्रास्ताविक गोल्डमन सॅचही एक आघाडीची जागतिक वित्तीय संस्था आहे.जिचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात असे म्हटले आहे की भारताचा श्रीमंत वर्ग हा अर्थव्यवस्थेतील उपभोग्य वस्तूंच्या बाजारावर हुकूमत गाजविणार आहे.त्यांचा अंदाज आहे की भारतातील 60 दशलक्ष लोक असे आहे की ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे सरासरी 8 लाख आहे आणि ही लोकसंख्या 2027 मधे म्हणजे तीनच वर्षांनी 1 00 दशलक्षपर्यंत वाढेल.यासाठी त्यांनी यावर्षी फाइल झालेल्या इन्कम टॅक्स रिटर्नचा आधार घेतला आहे. गेल...