Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

भारतात नवश्रीमंतांची संख्या वाढते आहे !

 Blog No.2024/014. 

Date: -19th, January,2024.       

 

मित्रांनो,

            भारतातील श्रीमंत लोकांमध्ये भर पडत आहे आणि मुख्य म्हणजे त्यात नवश्रीमंताची संख्या अधिक आहे.आपल्या देशातील लोकांचा हॅचबॅक म्हणजे अगदी प्रायमरी कार,त्यानंतर मोडणारी म्हणजे सेडान यापेक्षा सध्या लोकांचा एसयुव्ही म्हणजे मोठ्या गाड्या,उंची कार खरेदी करण्यामागचा कल हेच दर्शवितो.या संबंधात आपण आज चर्चा करणार आहोत.         

प्रास्ताविक

गोल्डमन सॅचही एक आघाडीची जागतिक वित्तीय संस्था आहे.जिचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात असे म्हटले आहे की भारताचा श्रीमंत वर्ग हा अर्थव्यवस्थेतील उपभोग्य वस्तूंच्या बाजारावर हुकूमत गाजविणार आहे.त्यांचा अंदाज आहे की भारतातील 60 दशलक्ष लोक असे आहे की ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे सरासरी 8 लाख आहे आणि ही लोकसंख्या 2027 मधे म्हणजे तीनच वर्षांनी 100 दशलक्षपर्यंत वाढेल.यासाठी त्यांनी यावर्षी फाइल झालेल्या इन्कम टॅक्स रिटर्नचा आधार घेतला आहे.

गेल्या 5 वर्षांत ₹10 लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असल्याचे सांगून कर रिटर्न भरणाऱ्या लोकांची संख्या वार्षिक 19% वाढली आहे. याउलट, कर भरणाऱ्या लोकांच्या संख्येत मात्र एकूण वाढ केवळ 8% झाली आहे.याचा अर्थ हा ₹10 लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांची संख्या वाढते आहे.

गेल्या वर्षी SBI रिसर्चने देखील याचा शोध घेतला आणि सांगितले होते की एका दशकापूर्वी भारतीय करदात्यांचे मध्यम उत्पन्न सुमारे ₹4.4 लाख होते.ते आता ₹13 लाख आहे.याचा अर्थ असा की या वर्गातील लोकांचे कमी-उत्पन्न गटातून उच्च-उत्पन्न गटात संक्रमण झाले आहे. 

या वाढत्या श्रीमंत वर्गाचा फायदा कोणाला होतो?

जेव्हा एखादा देश असा बदल अनुभवत असतो तेव्हा सर्वात आधी या गोष्टीचा विचार केला जातो की या वाढलेल्या उत्पन्नाचा विवेकाधीन वापर होतो की नाही.अशा लोकांकडे अधिक खर्च करण्याजोगे उत्पन्न असते आणि त्यांना आर्थिक सुरक्षितता असते.त्यांना असुरक्षितेची फारशी काळजी वाटतं नाही.1950 च्या दशकातील अमेरिकेचा विचार करा. देशात बऱ्यापैकी तरुण लोकसंख्या होती, मजुरी वाढत होती आणि उपभोगतावाद वाढला होता. भारतातही असंच काहीसं चालू आहे का? हा प्रश्न उभा ठाकतो.

कारण या उपभोगात मोठी लवचिकता असते,म्हणजे उत्पन्न 1 ने वाढल्यास, उपभोग 1.25 ने वाढू शकतो.याचे एक कारण असे असू शकते की लोक कर्ज काढून उपभोग घेण्यास अधिक इच्छुक असतात. GS अहवाल हे स्पष्टपणे दर्शवतो की भारतात जारी केलेल्या क्रेडिट कार्डांची संख्या गेल्या 4 वर्षांत दुप्पट झाली आहे. आणि क्रेडिट कार्डवर खर्च केलेल्या रकमेत 2.5 पट वाढ झाली आहे. 

हा नवश्रीमंत कुठे पैसे खर्च करतो?

          पुढील ट्रेंड हे दर्शवितो की FMCG क्षेत्रात हिंदुस्तान युनिलिव्हरपेक्षा नेस्ले इंडिया वेगाने वाढत आहेत. फुटवेअर क्षेत्रात बाटापेक्षा वेगाने वाढणारी कंपनी मेट्रो आहे,फॅशन क्षेत्रात V-Mart पेक्षा वेगाने वाढणारी ट्रेंट ही कंपनी आहे  प्रवासी वाहनांमद्धे एंट्री-लेव्हल कारपेक्षा वेगाने वाढणारी SUV आहे आणि दोनचाकी वाहनांमद्धे आयशर ही कंपनी  उद्योगापेक्षा वेगाने वाढत आहे.

          यासाठी उत्पादक हे उत्पादनांमध्ये अधिक वैशिष्ट्ये (features) जोडत आहेत आणि त्यांना जास्त किंमतीत विकत आहेत. त्यांना असा विश्वास आहे की या ग्राहकांकडून ते जितक्या जास्त किंमती आकारतील तितका त्यांचा नफा ते टिकवून ठेवू शकतील. भारतातील रेफ्रिजरेटर आणि शूज यांसारख्या अनेक श्रेणींमध्ये उत्पादनांची सरासरी विक्री किंमत (ASP) वाढली आहे.म्हणजेच श्रीमंत लोक उपभोगाच्या मोहिमेवर जात आहेत.

 समारोप

            भारतात नवश्रीमंतांची लोकसंख्या वाढत आहे.पण क्रेडिट कार्डवर खर्च केलेल्या खर्चाची संख्या वाढणे, कर्जाची संख्या वाढणे म्हणजे जे पैसे तुमचे नाहीत ते खर्च करणे असा होतो.त्या सोबत तुम्ही स्वतः बचत करत असाल किंवा ही कर्ज वेळेआधी संपविण्याची तुमची योजना असेल तर तुम्ही डेब्ट ट्रॅप मधे अडकणार नाही. अन्यथा कठीण आहे असा निष्कर्ष काढता येईल.अर्थात भारतात कुठे काही चांगले होतं असेल तर दृष्ट लावणाऱ्यांची संख्या कमी नाही.कारण भारताची अर्थव्यवस्था मोठ्या जोमाने वाटचाल करत आहे.सरकारचा जो पर्यन्त उद्योगांना पाठिंबा असेल तोपर्यंत अर्थव्यवस्थेची वाटचाल अशीच होत राहील. फक्त खर्च आणि कर्ज वाढवितांना आपले अंथरुण पाहून हातपाय पसरावे एवढेच मी म्हणेन.  

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु, पुणे.

image courtesy@finshots

Comments

Post a Comment