Skip to main content

Posts

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

उपवासाचे फायदे

  Blog No.2023/26 9             Date:- 22nd ,October 2023.   मित्रांनो ,             सध्या नवरात्र सुरू आहे.बरेच लोक या दिवसात नऊ दिवस उपवासाचे व्रत ठेवतात. उपवास ही एक प्रथा आहे , ज्यामध्ये विशिष्ट कालावधीसाठी स्वेच्छेने अन्न किंवा पेय वर्ज्य केले जाते.शतकानुशतके विविध संस्कृती आणि धर्मांमध्ये उपवास ठेवण्याची प्रथा आहे. उपवास म्हणजे आपण लोक करतो तसला उपवास नव्हे म्हणजे साबुदाण्याची खिचडी,बटाट्याची भाजी,रताळ्याचे गोड काप,लोणावळ्याची चिक्की, बटाट्याचे वेफर्स, दाण्याची आमटी किंवा फ्रूट सॅलड खायचं याला उपवास नव्हे फराळ म्हणतात,त्याला फराळ हे संयुक्तिक नांव आहे.पण उपवास करण्याचे काही फायदे आहेत. ते आज आपण बघू या.   प्रास्ताविक             उपवास म्हणजे लंघन किंवा काहीही न खाण्याचे काही फायदे आहेत. ते पुढीलप्रमाणे:-    1.       वजन व्यवस्थापन: उपवासामुळे कॅलरी ची कमतरता निर्माण होऊन वजन कमी होण्यास मदत...

देवीचे नवरात्र आणि स्त्रीचा मानसन्मान

  Blog No.2023/26 7            Date:- 21 st ,October 2023.         मित्रांनो,                आज अष्टमी, देवीच्या नवरात्रातील अष्टमीला अनन्य साधारण महत्व आहे.काही जातीमध्ये नवरी मुलगी लग्नानंतर सतत 5 वर्षे अष्टमीच्या दिवशी देवीच्या मंदिरात जाऊन देवीची साग्रसंगीत पूजा करते, संध्याकाळी मंदिरात घागर फुंकण्याचा कार्यक्रम असतो.अष्टमीच्या दिवशी गुजराती लोकांमध्ये दांडिया खेळण्याचा कार्यक्रम होतो.तर आज आपण महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांची माहिती घेणार आहोत.   प्रास्ताविक             2020 ला आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे 2020 आणि 2021 ला सगळ्याच प्रकारच्या सार्वजनिक उत्सवांना मर्यादा आला होत्या. मागच्या वर्षी 2022 ला हे निर्बंध उठवले गेले. पण तरी लोकांमध्ये थोडी साशंकता होती.यावर्षी मी लोक अतिशय उत्साहात नवरात्र साजरे करत आहेत.            मह...

तोंडाची चव जाणे कारणे आणि उपाय

Blog No.2023/266             Date:- 20 th ,October 2023.   मित्रांनो ,                आपण बऱ्याच वेळा म्हणत असतो की तोंडाला चव नाही आहे किंवा इतरांना देखिल म्हटलेलं कानी येतं, आज माझ्या तोंडाला चव नाही आहे. आपण तेवढे चिकित्सक नसतो,त्यामुळे असं कशामुळे होतं असेल किंवा जर होतं असेल तर ते सुधरविण्यासाठी काही उपाय देखिल असतात यावर फारशी चिकित्सा करत नाही. सर्वसामान्य कारण सांगितलं जातं,अरे तुझं पोट बिघडलं असेल.पण नाही मित्रांनो,याची बरीच कारणं असतात आणि ती दूर करण्याचे उपाय देखिल असतात. आजच्या ब्लॉग मध्ये हे आपण पहाणार आहोत.         प्रास्ताविक                  तोंडाला चव नसणे याची बरीच कारणं असू शकतात,ती कारणं खालील प्रमाणे:- 1 . संक्रमण ( Infection ) : विषाणूजन्य ( Viral )  किंवा बॅक्टेरियाचे ( Bacterial ) संक्रमण झाल्यामुळे ...

उत्सव म्हणजे श्रद्धा,भक्ती? की एक इवेंट?

Blog No.2023/277             Date: -   24 th, October   2023.   मित्रांनो,             आजचे माझे लेखाचे शीर्षक वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.पण बुवाबाजी आणि भोंदुगिरी यासारख्या गोष्टींमुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिति सारख्या संघटनांचा उदय झाला.आणि त्यात काही प्रमाणात अंधश्रद्धे सोबत श्रद्धेचे निर्मूलन झाले आहे.कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये अगदी पुसटशी रेषा आहे.श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या कल्पना व्यक्तिसापेक्ष अश्या आहेत. माझ्यासाठी जी श्रद्धा आहे ती तुमच्यासाठी अंधश्रद्धा असू शकते आणि vice versa. आज या विषयावर मी लिहिणार आहे.   आपला परिसर             मित्रांनो,आज आजूबाजूला नुसती नजर टाकली तर काय दिसतंय. माणूस स्वतःला इतरांपासून दूर ठेवू इच्छित आहे.स्वार्थी झाला. भ्रष्टाचार, हिंसाचार,व्यभिचार हे सगळे दुराचार वाढले आहेत आणि सदाचार आणि शिष्टाचार वगैरे शब्दकोशातले शब्द झाले आहेत.या परिस्थितीमुळे मी व...

पुस्तकांचे हॉटेल Hotel Relax Corner

  Blog No.2023/26 5             Date: -   19 th , October 2023.   मित्रांनो,             तुम्ही आपल्या आसपास अनेक वेगवेगळी हॉटेल्स बघितली असतील.पहिला प्रकार म्हणजे प्युअर व्हेज, मग नॉन-व्हेज, चायनिज, उडुपी किंवा अस्सल महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थ मिळणारे मिळणारे म्हणजे पाववडा, मिसळ, मिसळ पाव वगैरे वगैरे.बाकी आणखी प्रकारांमद्धे मी जात नाही.पण पुस्तकांचे हॉटेल कुठे बघितलंत कां? या पुस्तकाच्या हॉटेलची ओळख आज मी तुम्हाला करून देणार आहे. प्रास्ताविक             सहा महिन्यापूर्वीची गोष्ट असेल,मला माझ्या एका मित्राने एक विडियो पाठवला.खाली त्याने लिहिले होते “मित्रा,तुझ्या पुस्तकप्रेमी समूहाच्या चळवळीपेक्षा मोठं काम,एक अल्पशिक्षित 73 वर्षाची आजी करते आहे. हा यू ट्यूब विडियो बघ.” मी तो विडियो बघितला आणि खरोखर या आजीचे कार्य कुठल्याही पूर्ण शिक्षित माणसापेक्षा मोठं आहे.मी त्या “हॉटेल रिलॅक्स कॉर्नर” चा फोन नंबर मिळवला.तो फोन नंबर होता,आज...