Blog No. 2023/1 35 Date: 30th, May 2023. मित्रांनो, पर्यावरणाविषयी एकूणच सगळीकडे जागरुकता निर्माण करण्याचे कार्य जागतिक पातळीवर सुरु आहे.अशातच एक बातमी वाचण्यात आली की,भारतातील जंगलतोड रोखण्यास युरोपियन युनियन मदत करू शकते.या बातमीने तुम्हाला आश्चर्य वाटले असेल ना? तसं मलाही वाटलं. पण पूर्ण बातमी वाचल्यावर नेमकं काय ते कळलं.त्यावरच आहे माझा आजचा ब्लॉग. प्रास्ताविक युरोपियन युनियन हा युरोप खंडातील 27 देशांचा संघ आहे.युरोपियन युनियनकडे वस्तूंचे उत्पादन घेण्याची क्षमता नाही.म्हणजे त्याचे उत्पादन घेण्यासाठी त्यांच्याकडे योग्य जमीन आणि हवामान नाही.त्यामुळे त्या विशिष्ट वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी ते इतर देशांवर अवलंबून आहेत.युरोपियन युनियन मधील देशांना चॉकलेट आणि बिस्किटांसह इतर बर्याच वस्तूंच्या उत्पादनांमध्ये पाम तेल मोठ्या प्रमाणात लागते.पण हे देश पाम तेलाचे उत्पादन करीत नाहीत.त्यांना त्यांच्या देशात जर पाम त...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .