Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

राजेश रोशन -कर्णमधुर गीतांचा संगीत दिग्दर्शक

 Blog No. 2023/129  

Date: 23rd, May 2023.


मित्रांनो,

             “छु कर मेरे मन को किया तूने क्या इशारा’ स्व. किशोरकुमार यांनी गायिलेले हे सुंदर गीत तुम्हाला आठवत असेल.या सुंदर गीताला तेवढीच सुंदर चाल संगीतकार देणारे राजेश रोशन यांचा जन्म दिवस त्यांचे अभिष्टचिंतन करणारा हा आजचा ब्लॉग.

 

प्रास्ताविक

               राजेश रोशन लाल नगरठ यांचा जन्म 24 मे 1955 चा.हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रोशन आणि गायिका इरा रोशन यांचे पुत्र. राजेश यांचे वडील पंजाबी आणि आई बंगाली. राजेश यांना दोन मुले आहेत. ईशान रोशन हा मुलगा आणि पश्मिना रोशन. राजेश रोशन हे प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांचे बंधु आणि अभिनेता हृतिक रोशनचे काका.                           

 कारकीर्द

            राजेश रोशन यांना सर्वात पहिल्यांदा संधी दिली ती अभिनेता महमूद याने.मेहमूदचा कुंवारा बाप हा राजेश रोशनचा संगीत असलेला पहिला चित्रपट 1974 ला आला होता. यातलं “सज रही गली मेरी मा सूनहरे गोटेमे” हे महंमद रफी यांनी गायिलेले गीत खूप लोकप्रिय झाले होते. याच चित्रपटातलं किशोरकुमारने गायिलेले “मै हूं घोडा ये है गाडी मेरी रिक्शा सबसे निराली” हे गाणे देखील खूप गाजले. त्यानंतर आला तो ‘जुली’ हा चित्रपट. विक्रम आणि लक्ष्मी ही नवी जोडी असलेला चित्रपट खूप गाजला आणि यातील गाणी देखील.”भूल गया सब कुछ याद नाही अब कुछ” हे किशोर-लता चे युगल गीत, किशोरकुमारचे “दिल क्या करे जब किसी को किसी से प्यार हो जाये” ही गाणी खूप गाजली.‘जुली’ साठी राजेश रोशन यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.

            यानंतर देव आनंद यांचे सलग तीन चित्रपट आले. देस परदेस, मन पसंद आणि लूटमार. देस परदेस मधील “नजराना भेजा किसी ने प्यार का” किशोरकुमारनी गायिलेले गाणे खूप गाजले.तसेच “जैसा देस वैसा भेस फिर का डरना” हे किशोर-लता युगल गीत खूप गाजले. लूटमार मधील आशा भोसले यांचे “जब चाहे मेरा जादू कोई बच ना पाय” या गीताने तर अक्षरशः धूम केली. मामा भांजा, दूसरा आदमी, मुकद्दर, स्वामी, प्रियतमा, यही है जिंदगी, एक ही रास्ता, स्वर्ग नरक, इंकार, खट्टा मीठा, बातों बातों में, दो और दो पांच,याराना यांसारख्या चित्रपटांना संगीत दिले. कामचोर, हमारी बहू अलका, जाग उठा इंसान, भगवान दादा, घर संसार यानंतर राजेश खन्ना यांच्यासोबत जनता हवालदार, निशान, बाबू आणि आखिर क्यों हे चित्रपट केले.


त्यांची लोकप्रिय गाणी

            त्यांच्या लोकप्रिय गीतांची खरं तरं एक मोठी यादी होईल. मलाच इतकी गाणी माहिती आहेत की अगदी गूगलची मदत न घेता सुद्धा करता येईल.

 


1.      “स्वामी”  यादो मे वो सपनो मे है जाये कहा- किशोरकुमार  

2.     “स्वामी”  का करू सजनी आये ना बालम-येसुदास

3.      “स्वामी” पल भर मे ये क्या हो गया- लता मंगेशकर

4.     “प्रियतमा” कोई रोको ना दिवाने को मन मचल रहा-किशोरकुमार

5.      “इंकार” मुंगडा मुंगडा मै मुडके चली-उषा मंगेशकर

6.     “खट्टा मीठा” थोडा है थोडे की जरूरत है-किशोरकुमार लता मंगेशकर  

7.     “खट्टा मीठा” ये जीना है अंगूर का दाना- किशोरकुमार-उषा मंगेशकर

8.      “याराना” तेरे जैसा यार कहा, कहा ऐसा याराना-किशोरकुमार

9.      “याराना”  “छु कर मेरे मन को किया तूने क्या इशारा’ किशोरकुमार

10.    “याराना” भोले ओ भोले तू रुठा दिल टुटा-किशोरकुमार

11.    “काम चोर” तुझ संग प्रीत लगायी सजना-किशोरकुमार-लता मंगेशकर

12.   “मि.नटवरलाल” परदेसिया ये सच है पिया-लता मंगेशकर-किशोरकुमार

13.   “बातो बातोमे” सुनिये कहिये कहिये सुनिये-आशा भोसले-किशोरकुमार

14.   “कहो ना प्यार है” दिल ने दिल को पुकारा-बाबूल सुप्रियो आणि कोरास

 

समारोप

 अशा या सुमधुर आणि कर्णप्रिय संगीतकार राजेश रोशन यांना त्यांच्या 59 व्या वाढदिवसाबद्दल मनापासून शुभेच्छा आणि त्यांच्या कडून अशीच संगीत सेवा घडत राहो शुभेच्छा. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु,पुणे.    

Comments

  1. मीनल ओगले.May 24, 2023 at 1:37 PM

    राजेश रोशन यांनी संगीत दिलेली गाणी मला पण आवडतात.त्यांचे वडील रोशन यांनी संगीत दिलेली गाणी पण मला आवडतात.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...