B log No. 2023/43 Date: 20th, February 202 3 . मित्रांनो, महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची काल जयंती झाली.माझ्या मित्रांनी मला विचारले देखिल, कि आम्हाला वाटले की आज तू महाराजांबद्दल ब्लॉग लिहिला असशील.माझ्या मनांत होतं पण मी काल नाही लिहिला,कारण काल विविध माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही खूप काही वाचले असेल.छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख नाही,असा अखिल महाराष्ट्रात तर कुणी नसेलच पण भारतातही नसेल.मागे मी राजस्थानला एलटीसीवर गेलो होतो तेव्हा एका ब्लॉग मधे लिहिले होते,की उदयपूरमधे महाराणा प्रताप ह्यांचा त्यांच्या चेतक घोड्यावरील पुतळा पहावयास मिळाला राजस्थानात सगळे राजे “महाराजा” हे बिरुद मिरवितात.मग एकटे महाराणा प्रताप हे “महाराणा” कसे.असे मी आमचा ट्रीप मधील ड्रायवर कमलेशला विचारले तेव्हा तो मला म्हणाला “सर अपने देशने केवल दो ऐसे महारथी हो गए जो मुग़लोंके शरण मे नहीं गए.वो थे छत्रपती शिवाजी महाराज और महाराणा प्रताप . बाकी सब जो शरण गये वो सब महार...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .