Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

मानसिक आजार एक समस्या

 Blog No. 2023/42      

Date: 19th, February 2023. 


मित्रांनो,

            अगदी परवाची गोष्ट मी बाजारात गेलो होतो.महाशिवरात्र म्हणून बेल,धोत्रा आणि फुलं घेऊन यावी म्हणून बाहेर पडलो.वेळ सकाळी 10.35 ची,आमचे फॅमिली डॉक्टर दवाखान्याजवळ आपली गाडी पार्क करीत होते.मी नमस्कार केल्यावर,त्यांनी काय कुठे निघालात वगैरे विचारल्यावर,मला म्हणाले थोडा वेळ आहे कां?थोडं बोलायचे आहे.मला वाटलं त्यांना माहित होतं की मी बँकेत होतो.त्यामुळे काही लोन वगैरे बद्दल विचारतील.मी म्हटलं हो आहे वेळ.तर म्हणाले चला क्लिनिकमधे बसू.आम्ही क्लिनिक मधे  जाऊन पोहोचलो.

 

डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट

क्लिनिकमधे पोहोचल्यावर ते मला म्हणाले “सर,एक माझे पेशंट आहेत.बरेच वर्ष झाले,काही छोटं मोठं दुखणं झालं की माझ्याकडे येतात.काल माझ्याकडे आले आणि म्हणाले मी जीवनापासून खूप निराश झालो आहे.तीन मुली,जेमतेम एकीचे लग्न झालं.दोन लग्नाच्या आहेत.कोविड काळांत माझी नोकरी गेली.गेली म्हणजे फॅक्टरी बंद पडली, मालक कोविडने गेले.घरी फॅक्टरी चालविण्याचे ज्ञान कुणालाच नाही.proprietary फर्म होती. त्या फर्म मधे 25 वर्षे नोकरी केली.अगदी थोरल्या मालकापासून ते धाकल्या मालकापर्यंत.आता 55 वय माझं,कोण नोकरी देणार.बायको म्हणाली,निराश होऊ नका.मी धुणी भांडी करीन.आता सांगा तिनं कधी हे काम केलं नाही.आता 50 व्या वर्षी कुठं जमायला आणि खरं सांगू कां,तिनं काही करावे ही माझी इच्छा नाही. डॉक्टर साहेब, हे नैराश्य सरणे नाही.एखादी गोळी असेल तर सांगा ना पटकन जीवन संपून जाईल अशी.मी त्यांना म्हटले मी जीवनदान देणारा डॉक्टर आहे आणि मीच काय कुणीही डॉक्टर जीवन संपवायला मदत करणार नाही.मानसोपचार तज्ञ तुमच्या नैराश्याला दूर करु शकतील. सांगा सर आता, असे बरेच पेशंट माझ्या कडे येतात,त्यांना मी सांगतो त्याचा इलाज माझ्याकडे नाही.तुम्ही ब्लॉग लिहिता,ह्या गंभीर समस्येला तुम्ही वाचा फोडायला हवी.

 


मानसिक रोगाबद्दलचे वास्तव  

मी सुन्न होऊन घरी परतलो.मी वाचलं होतं की कोविड नंतर हे प्रमाण खूप वाढलं आहे.पण जेव्हा मी “द लॉजिकल इंडियन” चे आर्टिकल वाचले,तेव्हा मला समस्येचे गांभीर्य अधिक चांगले कळले.भारतात एकूण 5 करोड  60 लाख एवढे लोक वैफल्याने पछाडले आहेत तर 3 करोड 80 लाख हे चिंताग्रस्त (Anxiety Disorder) आहेत.भारतात मानसिक रोगी हे 15 करोडच्या आसपास आहेत. भारतात मनोविकारतज्ञ (Psychiatrist)  आणि मानसशास्त्रज्ञ (Psychologist) ह्यांचे मिळून प्रमाण हे दर एक लाखामागे 4 ते 5 एवढे आहे. मानसिक रुग्णांचे प्रमाण हे केरळ,कर्नाटक,तेलंगणा, तामिळनाडू,हिमाचल प्रदेश,महाराष्ट्र, आंध्र प्रदेश,मणीपुर आणि पश्चिम बंगाल मधे अधिक आहे.

 

मानसिक रोग हा आजार हे समजून घेण्याची गरज

भारतात मानसिक रुग्णाला आजार म्हणून उपचार करण्याची आवश्यकता असते.ही मानसिकता शिक्षणाचे प्रमाण वाढूनही तयार झाली नाही.असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.मानसिक रुग्णास अरे तो वेडा आहे,तो डोक्याने कमी आहे, तो नाटक करतो  किंवा गंमतीने मतिमंद आहे असे म्हटले जाते.खरं म्हणजे मतिमंद असणे हा आजार आहे.तो अधिकतर जन्माच्या वेळेस काही कारणांमुळे होऊ शकतो.

 

 

मानसिक आजारांची कारणे

मानसिक आजारांची कारणे पुढील प्रमाणे आहेत.बाळपणातील  अत्याचार,आघात किंवा दुर्लक्ष,सामाजिक एकटेपणा  किंवा एकाकीपणा,वर्णद्वेष आणि भेदभाव,दारिद्र्य,कर्जबाजारीपणा,जवळच्या व्यक्तीचे मरण,घटस्फोट,तीव्र किंवा दीर्घकालीन ताण,दीर्घकालीन आजार,बेरोजगारी अथवा नोकरी सुटणे,घरगुती हिंसाचार, मद्यपान, गुंडगिरी,एखाद्या गंभीर समस्येने ग्रासणे किंवा एखाद्या हिंसक घटनेत सहभागी होणे. ह्या कारणाने मानसिक आजार होऊ शकतो.ही कारणे आहेतच.पण ह्यातील काही कारणांमागे जीवघेणी स्पर्धा, वाढत्या गरजा आणि त्यासाठी पुरे न पडणारे उत्पन्न,आपण इतरांपेक्षा कसे वेगळे किंवा मोठे आहोत हे दाखविण्याचा हव्यास.”अंथरुण पाहून पाय पसरावे” ह्या उक्तीस दिलेली तिलांजलि, पाश्चात्यांचे अंधानुकरण ह्या गोष्टी कारणीभूत आहेत, असे मला वाटते.

 

ह्यावर उपाय

मी मघाशी डॉक्टर साहेबांची जी गोष्ट सांगितली त्यातल्या त्या माणसाने विचारलेला एक प्रश्न म्हणजे,इतर डॉक्टरचे जसे नेमबोर्ड दिसतात.तसे मी मनोविकारतज्ञ (Psychiatrist)  आणि मानसशास्त्रज्ञ (Psychologist) ह्यांचे  नेमबोर्ड पाहिले नाहीत.हे अगदी खरे आहे. ह्यासाठी मनोविकारतज्ञ (Psychiatrist)  आणि मानसशास्त्रज्ञ (Psychologist) यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आवश्यक आहे.त्या सोबतच हे कोर्स करण्यासाठी तरुण मुलांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.कारण मानसिक आजार झालेल्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 20% एवढी होण्याआधीच काही करणे आवश्यक आहे. कारण मानसिक रोग्यांमध्ये लहान मुले आणि तरुणांची संख्या अधिक आहे हे चिंतेचे कारण आहे.




प्रसाद नातु,पुणे.

 

  

                                                                                                                                                                          

Comments

  1. Nice blog. Thanks for writing on this important topic which is ignored on a whole.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...