Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

Blog No. 2023/43       

Date: 20th, February 2023. 

 

मित्रांनो,

            महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची काल जयंती झाली.माझ्या मित्रांनी मला विचारले देखिल, कि आम्हाला वाटले की आज तू महाराजांबद्दल ब्लॉग लिहिला असशील.माझ्या मनांत होतं पण मी काल नाही लिहिला,कारण काल विविध माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही खूप काही वाचले असेल.छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख नाही,असा अखिल महाराष्ट्रात तर कुणी नसेलच पण भारतातही नसेल.मागे मी राजस्थानला एलटीसीवर गेलो होतो तेव्हा एका ब्लॉग मधे लिहिले होते,की उदयपूरमधे महाराणा प्रताप ह्यांचा त्यांच्या चेतक घोड्यावरील पुतळा पहावयास मिळाला राजस्थानात सगळे राजे “महाराजा” हे बिरुद मिरवितात.मग एकटे महाराणा प्रताप हे “महाराणा” कसे.असे मी आमचा ट्रीप मधील ड्रायवर कमलेशला विचारले तेव्हा तो मला म्हणाला “सर अपने देशने केवल दो ऐसे महारथी हो गए जो मुग़लोंके शरण मे नहीं गए.वो थे छत्रपती शिवाजी महाराज और महाराणा प्रताप. बाकी सब जो शरण गये वो सब महाराजा कहलाते है .” माझा उर अभिमानाने भरून आला.तो जेवढ्या अभिमानाने महाराणा प्रताप यांच्या बद्दल बोलत होता,तेवढाच अभिमान त्याच्या बोलण्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दिसला.म्हणूनच म्हटलं की त्यांची ओळख नाही असा भारतात देखिल कुणी नसेल.

 


छत्रपती शिवाजी महाराजांची महानता

            मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आज काल जो कुणी उठेल तो बडबड करतो.कुणी म्हंटलं की छत्रपती शिवाजी महाराज आता जुने झाले.मित्रांनो दैवत जे असतं ना ते कधीच जुनं होतं नाही.ते सदैव वंदनीयच असतं.तसेच छत्रपती शिवाजी महाराज काय फक्त योद्धा होते की ते केवळ त्यांनी लढलेल्या लढायांमुळे लक्षात राहतील.उलट ते ज्यांचाशी लढले त्यामुळे कदाचित ते लोक आज आपल्याला माहिती आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते.कल्याणकारी राज्य ही संकल्पना कदाचित त्यांच्यापासूनच आपण घेतली असावी.वयाच्या तारुण्यात ज्यांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि शेवटी स्वराज्याची स्थापना केली आणि ते छत्रपती झाले.ह्यातच त्यांचे मोठेपण सामावलेले आहे.अन्याय,जुलूम,अत्याचार या विरुद्ध निर्णय घेतांना ते अतिशय कडक प्रशासक होते.ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसतं.हे मी वेगळे सांगायची गरज नाही. शिवचरित्राबद्दल मी ह्या ब्लॉग मधे काहीच लिहीत नाही.कारण ते सर्वांना माहित आहे.त्यांच्याबद्दल काही बोलण्याआधी प्रत्येकाने ते अवश्य वाचावे ही अपेक्षा आहे.आई राजमाता जिजाबाई ह्या त्यांच्या मार्गदर्शक होत्या.जीवनात पहिली गुरु आईच असते.त्यांना आईबद्दल नितांत आदर होता,प्रेम होते,भक्ती होती, निष्ठा होती. स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात अत्यंत आदराचे स्थान होते.

 

छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यपद्धती

त्यांच्या काळातील गडकिल्यांचे व्यवस्थापन,त्यांचे व्यवस्थापन,त्यांची युद्धनीती ज्यात गनिमी काव्याचा समावेश होतो.सह्याद्रीच्या पर्वतरांगांत जर बलाढ्य शत्रूशी परिणामकारकपणे मुकाबला करायचा असेल,तर गनिमी कावाच कामात येईल हे त्यांनी हेरले होते.शिस्तबद्ध लष्कर आणि सुसंघटित प्रशासकीय व्यवस्था हे त्यांच्या  कार्यपद्धतीचे वैशिष्ठ.त्याच्याच जोरावर त्यांनी एक भक्कम आणि सामर्थ्यशाली राज्य उभारले.महाराजांनी आरमाराचे महत्व ओळखले.त्यांनी कोकण किनारा आणि गोव्याच्या किनाऱ्याच्या संरक्षणासाठी आपले स्वतःचे आरमार उभारले होते. प्रदेशातील भूभागाची सखोल माहिती,वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याच्या जोरावर त्यांनी अनेक लढाया जिंकल्या.त्यांनी राज्यकारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती.हे मंत्री राज्यकारभारविषयक कामांत महाराजांना मदत करीत असतं.त्यांचे दक्षिण दिग्विजय,उमराणी आणि नेसरीच्या लढाया,पन्हाळ्याचा लढा,पावनखिंडीची लढाई,आग्राहून सुटका,शाहिस्तेखानाशी लढाई,अफजलखानाशी मुकाबला, विजापूरच्या सलतनतशी संघर्ष या आणि अशा असंख्य रणसंग्रामातून शिवरायांच्या मुत्सद्देगिरीची आणि राजकीय कुटनीतीची कल्पना येते.त्यांच्या शिस्तबद्ध आणि सक्षम प्रशासकीय संघटनाच्या जोरावर त्यांनी कुशल नागरी शासन प्रस्थापित केले. अतिशय बुद्धिमान,पराक्रमी,धोरणी,मुत्सद्दी अशी कित्येक विशेषणे लिहिली तरी कमी  पडतील,अशा छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जन्मदिनी माझे लक्ष्य लक्ष्य प्रणाम.

 

प्रसाद नातु,पुणे.        

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...