Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

शेगांवीचा राणा आळंदीत

 Blog No. 2023/38    

Date: 14th, February 2023.

मित्रांनो, 

            काल म्हणजे 13 फेब्रुवरी,2023 ला संत श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन होता. हा दिवस श्री गजानन महाराज संस्थान शेगांव येथे मोठ्या दिमाखात साजरा केला जातो.शेगांवला अलोट गर्दी असते.आजकाल जागोजागी गजानन महाराज मंदिर स्थापन केले आहेत. तिथे हा उत्सव साजरा केला जातो.पण प्रत्यक्ष श्री गजानन महाराज संस्थान,शेगांव ह्यांनी उभारलेले एक सुंदर मंदिर आळंदी-देहू रोड वर आळंदी येथे आहे.काल तेथे जाऊन दर्शन घेतले. तसे मी तिसऱ्यांदा ह्या मंदिरात गेलो.पण तेव्हा ब्लॉग लिहीत नव्हतो.आता लिहायला सुरुवात केली आहे.तेव्हा म्हटलं आज ह्या मंदिरावर ब्लॉग लिहू.पश्चिम महाराष्ट्रात जी महाराजांची भक्त मंडळी रहाते.त्यांच्यासाठी हा ब्लॉग उपयोगी ठरेलआणि माझी श्री गजानन महाराजांच्या चरणी तेवढीच सेवा. 

श्री गजानन महाराज संस्थान, आळंदी                 

                पुणे रेल्वे स्टेशन पासून साधारणतः 19 किमी अंतरावर आळंदीत शिरता शिरता, देहू आळंदी रस्त्यावर हे संत श्री गजानन महाराजांचे सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे.आळंदीकडून देहूकडे जाताना चौकापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर डाव्या हाताला हे मंदिर आहे.मला ह्या मंदिराचे लोकेशन खूप आवडले.हे देहू आळंदी रोडवर आहे."ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालसे कळस " ह्या दोन महानुभावांच्या मधे शेगावीच्या राणाचे  मंदिर, प्रवेश द्वारातून शिरल्यावर दुरुनच टेकडी वरील मंदिराचे दर्शन होते.मंदिरासारख्या पवित्र आणि प्रसन्न जागी लागणारी स्वच्छता आणि पावित्र्य येथे अनुभवास मिळते,ते वाखाणण्यासारखे आहे.जसे शेगावच्या मंदिरात अनुभवयास मिळते अगदी तसेच. 


              प्रवेश द्वारातून आंत गेल्यावर मंदिराकडे जाण्याऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भक्तनिवास आहेत.त्यांना नावे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ह्यांची दिलेली आहेत. उजव्या हाताला महाप्रसादासाठी हॉल आहे.प्रगट दिन आणि ऋषि पंचमी सोडून इतर दिवसही इथे महाप्रसाद दिवसभर मिळतो.सगळीकडे शिस्त पहावयास मिळते.गर्दी कितीही असली तरी कुठेही गोंधळ नाही,वादावादी नाही."चला पुढे चला पुढे" अशी ढकलाढकली नाही.अगदी ज्या प्रसन्न मनाने घरुन निघालो असतो तो मुड कायम ठेऊन दर्शन घेता येते.मंदिर टेकडीवर असल्याने पायऱ्या चढून वर जावे लागते.मधून मधून बसायला बेंच ठेवले आहेत.सर्वात वरच्या मजल्यावर मंदिर,त्या खालच्या मजल्यावर गादी आणि पादुकांचे दर्शन होते.पोथी वाचनासाठी हॉल आहे.त्या खालच्या मजल्यावर गजानन महाराजांची पोथी,फोटो वगैरे विक्रीसाठी एक ऑफिस आहे.चपला ठेवण्यासाठी मोफत व्यवस्था आहे. तसेच हात पाय धुण्यासाठी व्यवस्था आहे,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे.तिसऱ्या मजल्यावर पोहोचल्यावर मंदिराचा परिसर बघावयास मिळतो.तिथून परिसर खूपच सुंदर दिसतो.  भक्तनिवासाच्या मधे एक भजन कार्यक्रमासाठी देखिल एक हॉल आहे.  

वाहतुकीची साधने 

   स्वतःची कार घेऊन आलात आणि भक्तनिवांसात उतरलात तर आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे.अन्यथा रोडच्या बाजूला कार पार्क करता येते.पुणे रेल्वे स्टेशन आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशन पासून पीएमटीच्या बसेस उपलब्ध आहेत.तुम्ही स्वतःची कार घेऊन  औरंगाबाद-नगर रस्त्याने आलात तर लोणीकंदहून आळंदीला सरळ रस्ता आहे.थोडा खराब आहे,कारण त्याचे काम सुरु आहे.नासिककडून आलात तर मोशीहून देहू आळंदी रस्त्याला डाव्या हाताला आळंदी आहे. मुंबईहून आलात तर नासिक फाट्याने सरळ पुणे-नासिक रोडने भोसरीपर्यन्त येऊन उजव्या हाताला आळंदीकडे येऊ शकता किंवा मोशीपर्यन्त येऊन देहू आळंदी रस्त्याने उजव्या हाताला वळून आळंदीला पोहोचू शकता. कोल्हापूरहून आल्यास जुन्या मुंबई-पुणे रस्त्याने आळंदीकडे जाणारा रस्ता आहे. त्याने येऊ शकता. 

सारांश 

       मला आजवर नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी रहायचा प्रसंग आला. वेगवेगळ्या ठिकाणची श्री संत गजानन महाराज मंदिरे पहाण्यात आली. पण शेगावच्या मंदिरात दर्शन घेण्याचा जो आनंद आहे,तो फक्त आळंदीच्या मंदिरात मिळाला.कारण ते शेगांवच्या संस्थानचे मंदिर आहे. त्यामुळे शेगांवची शिस्त,स्वच्छता,पावित्र्य,मांगल्य हे सारे जपण्याचे कार्य ह्या मंदिरात संस्थांनाकडून घेतले गेले आहे.खरं पाहता "देव साऱ्या चराचरी व्यापला आहे.अगदी आपल्या घरी सुद्धा.हे मी मानतो.रामदास कामतांच्या एका भक्तिगीतात जे म्हटले आहे "कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात,मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात" हे देखिल मी मानतो.पण मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने जे मनाला आत्मिक समाधान मिळतं,ते अलौकिक असेच असते. संत श्री गजानन महाराजांना मी माझे गुरु मानले आहे. जीवनात गुरु एकच असावा असे म्हणतात.मी इतर संतांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो.पण जसा शाळेत क्लास टीचर हा एका वर्गासाठी एकच असतो,तसेच गुरुच्या बाबतीत असायला हवे.असे मला वाटते. तर मित्रांनो आळंदीच्या मंदिराला अवश्य भेट द्या. तुम्हाला मिळणारा आनंद मला मिळालेल्या आनंदापेक्षा नक्कीच वेगळा नसेल ह्याची खात्री आहे, "जय गजानन श्री गजानन"      


प्रसाद नातु.           

                        

Comments

  1. छान आहे

    ReplyDelete
  2. जय गजानन श्री गजानन🙏🌺🌺

    ReplyDelete
  3. Replies
    1. Thanks sir, for your encouragement. You can forward this in your other Groups

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...