Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

यु टर्न चा खरा अर्थ

 Blog No.2024/019

Date: -28th, January,2024.      

मित्रांनो,

           परवाच्या दिवशी मी बिहारचे भूतपूर्व मुख्यमंत्री,जननायक म्हणून प्रसिद्धीस पावलेले स्व.कर्पूरी ठाकूर यांना भारत सरकारचा सर्वोच्य नागरी सन्मान “भारतरत्न” (मरणोत्तर)  प्रदान करण्याची घोषणा हा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचे म्हटले जात आहे,असे लिहिले होते.पण त्या मास्टर स्ट्रोकचा इफेक्ट हो परिणाम म्हणण्यापेक्षा इफेक्ट जास्त परिणामकारक वाटतो, इतक्या लवकर जाणवेल किंवा होईल असं वाटलं नव्हतं.मी कालपासून ब्लॉग लिहिण्यासाठी ज्या बातमीची वाट पहात होतो. ती बातमी सकाळी 10.00 च्या सुमारास आली.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. संध्याकाळी 7.00 वाजता पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी.पण या वेळेस एनडीए च्या सोबत.सर्वच अनाकलनीय, कल्पनातीत.  

सविस्तर

             असं म्हटलं जातं की आजकाल किंवा कलियुगात जे घडतं आहे ते बऱ्यापैकी महाभारतात तुम्हाला आढळून येतं.पण मला असं वाटतं की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पात्र मात्र महाभारतकार महर्षी व्यास यांच्या महाभारतात आढळतं नाही.जवळपास एक महिन्यापूर्वी जी व्यक्ती एनडीएच्या विरोधी इंडी आघाडीचा पंतप्रधान पदासाठीचा चेहरा म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करा म्हणत होती.लोकशाही विरोधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आघाडी करण्यासाठी देशभरच्या विरोधी पक्षांना एकत्र आणून त्याचे मुख्य संयोजक होण्यासाठी धडपड करत होती.ती व्यक्ती पूर्ण यू टर्न घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए च्या सोबत जाण्यास तयार होते.

              आणि हे असं घडण्याच कारण ही वेगवेगळे सांगितलं जात आहे.स्व.कर्पूरी ठाकूर यांना भारत सरकारचा सर्वोच्य नागरी सन्मान “भारतरत्न” (मरणोत्तर)  प्रदान करण्याची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगल्या माणसाची कदर करतात,ही जाणीव अचानक जनता दल (यूनायटेड) या पक्षाला झाली. तसेच स्व.कर्पूरी ठाकूर यांनी राजकारणात परिवारवाद आणला नाही,आणि आपल्या सोबत इंडी आघाडीचे सर्व पक्ष परिवारवादाचे पुरस्कर्ते आहेत,याचीही अचानक जाणीव जनता दल (यूनायटेड) या पक्षाला झाली.असं ही ऐकायला मिळालं.मी मुद्दाम इंडी आघाडी म्हणतो कारण इंडिया हा देश जरी विविधतेने नटला असला ज्यात विविध भाषा बोलणारे लोक असले,ज्यात विविध जात,पंथ,धर्म,विचाराचे लोक असले तरी इंडिया हा देश एकसंघ आहे. तो कधीच दुभंगू शकत नाही.हेच त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट आहे,हीच  त्याची सर्वात मोठी ताकद आहे.

समारोप

             भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असे म्हटले जाते.भलेही ती गुणात्मक दृष्ट्या नसून संख्यात्मक दृष्ट्या सर्वात मोठी आहे.पण मोठी आहे म्हणूनच तर अशा अनाकलनीय, कल्पनातीत गोष्टी इथे घडू शकतात.एकंदर इंडी आघाडीचे काही खरे नाही.त्यांचे एक शिलेदार “भारत जोडो” म्हणत भारत जोडायला निघाले आहेत आणि ईकडे भारताच्या नावास साधर्म्य असलेली I.N.D.I.A असे नाव ठेवलेली आघाडी मात्र जोडली जायच्या आधी दुभंगते आहे.हे खरचं भारतीय लोकशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल की सत्तेत येण्यासाठी नाही तर सत्ताधारी पक्षाच्या निरंकुश कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष असावा यासाठी देखिल काही प्रयत्न होत नाहीत.     

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 प्रसाद नातु, पुणे.                                    

Comments

  1. Oppo sit in the extinction furnace. Will it awake itself from the deep slumber of given up attitude? Only time will tell. Well it's nothing impossible in Indian politics

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...