Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

अल्झायमर एक कठीण रोग

 Blog No.2024/018. 

Date: -27th, January,2024.         

 

मित्रांनो,

     आजकाल जरा जास्त प्रमाणात अल्झायमर या रोगाबद्दल बोललं जातंय, ऐकायला मिळतंय,वाचायला मिळतंय.कदाचित लोकांचे आयुर्मान वाढल्यामुळे हा रोग झालेल्यांची संख्या वाढली असेल,वाढत असेल.म्हणून या रोगाबद्दल आणि याच्या प्रारंभिक लक्षणांबद्दल आपण आज थोडे जाणून घेणार आहोत.यातील काही लक्षणे सर्वसामान्यपणे कमी प्रमाणात प्रत्येकात आढळून येतात. म्हणून लगेच आपल्याला अल्झायमर झालाय असे होतं नाही.पण ही लक्षणे जर एकत्रितपणे आढळल्यास,आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क प्रस्थापित करून आपल्या शंकेचे निरसन करून घेऊ शकतो.कारण या आजारावर अद्याप तरी कायम स्वरूपी असा उपचार शोधून काढण्यात तज्ञांना यश आले नाही.त्यामुळे प्रारंभिक अवस्थेत जर त्याचे निदान झाले तर त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते.आजचा ब्लॉग या विषयावर.

प्रास्ताविक                    

अल्झायमर हा एक डिजनरेटिव्ह रोग आहे जो मेंदूच्या पेशी नष्ट करतो,ज्यांना न्यूरॉन्स म्हणतात.1906 साली अलोइस अल्झायमर नावाच्या जर्मन डॉक्टरने हा शोधून काढला.म्हणून रोगाचे नांव देखिल या डॉक्टरच्या नावाने पडले असावे असे म्हणतात.स्मृतिभ्रंशाच्या या आजारावर अद्याप कायमस्वरूपी स्वरूपाचा उपचार सापडलेला नाही.त्यामुळे अल्झायमरच्या सुरुवातीच्या काही लक्षणांची जाणीव असणे महत्त्वाचे आहे.रोगाचे लवकर निदान झाले तर त्याची लक्षणे कमी करता येऊ शकतात.

जर तुम्ही तुमच्या स्कूटरची किल्ली किंवा घराची किल्ली कुठे ठेवली हे सतत विसरत असाल किंवा अलीकडील घटना किंवा नवीन माहिती तुम्ही विसरत असाल,तर हे कदाचित तुमच्या विसराळूपणामुळे असेल.किंवा कदाचित,तुम्हाला अल्झायमर विकसित होण्याचा धोका असू शकतो.अल्झायमरची लक्षणे खालील प्रमाणे आहेत.  

स्वतःला व्यक्त करण्यात अडचण

तुम्हाला जर योग्य शब्द शोधण्यात खूप त्रास असेल तर त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला अल्झायमर रोग आहे.पण तुम्हाला वाक्य पूर्ण करण्यात अडचण निर्माण होत असेल किंवा तुम्ही साधे शब्द विसरत असेल किंवा तुम्ही कुणाला चुकीच्या नावाने हाक मारत असाल,तुम्हाला तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना ओळखणे कठीण जात असेल,तर तुम्हाला अल्झायमरचा आजार होण्याचा धोका जास्त असतो.

दैनंदिन कामे पूर्ण करण्यात अडचण

तुमचे वॉशिंग मशीन कसे वापरायचे हे तुम्हाला आठवत नसेल,एवढेच काय तर तुम्ही दात कसे घासायचे ते विसरले असाल,तर ही अल्झायमरच्या सर्वात सुरुवातीच्या लक्षणे असू शकतात.तुमची नित्याची कामे करण्यात तुम्हाला अडचण जात असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.   

दिशाहीनता

अल्झायमरच्या प्रारंभिक लक्षणांपैकी एक म्हणजे दिशा विसरणे किंवा कोणता दिवस आहे हे विसरणे. ही लक्षणे आढळल्यास ती हलक्यात घेऊ नयेत आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

छोट्या छोट्या बेरीज वजाबाक्या करता न येणे   

            तुम्हाला जर साध्या साध्या बेरजा किंवा वजाबाक्या करण्यात जर त्रास होत असेल किंवा करता येत नसतील तर हे सुद्धा अल्झायमरच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे.

वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवणे

नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या वस्तू चुकीच्या पद्धतीने ठेवण्याची प्रवृत्ती जेव्हा विकसित होते जसे की  वॉशिंग मशीनमध्ये खरकटी भांडी किंवा डिशवॉशरमध्ये मळलेले कपडे टाकणे आणि मग ते कुठे ठेवलेत हे न आठवणे.ही अल्झायमरची लक्षणे असू शकतात.

आरशात स्वतःला न ओळखणे

आरशात स्वतःची प्रतिमा स्वतःला अनोळखी व्यक्तीची वाटणे हे अल्झायमरचे लक्षण असू शकते.

दृष्टी समस्या

वयाशी संबंधित दृष्टी कमी होणे आणि चष्मा घालावा लागणे हे सामान्य आहे. अल्झायमर असोसिएशन म्हणते तुम्हाला नजरेने अंतर मोजता येत नसेल किंवा रंग कोणता हे ओळखण्याची क्षमता तुम्ही गमावली असेल तर हे सामान्य नाही.या लक्षणांशिवाय सतत मूड बदलत रहाणे, एकटे रहाण्याची इच्छा होणे, व्यक्तिमत्वात होणारे बदल, कुठलेही काम करण्याचा उत्साह कमी होणे,स्वतःहून काहीही करावेसे न वाटणे,अंगातील ऊर्जा कमी होणे,थकवा वाटणे, समन्वय साधण्यात अडचणी येणे,मनात विचित्र विचित्र विचार येणे किंवा आयुष्यावरील नियंत्रण कमी झाल्याची भावना निर्माण होणे.हे जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्हाला अल्झायमर आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. 

समारोप

          आपल्यात आढळून येणाऱ्या एखाद दुसऱ्या लक्षणामुळे आपल्याला तो रोग झाला आहे असे वाटून घेण्यात काही अर्थ नाही.तर त्याची अधिकाधिक लक्षणे किंवा साधारणपणे असामान्य वाटणारी लक्षणे जाणवणे असे झाल्यास आपला संशय दूर करून घेणे आवश्यक असते.कारण काही वेळा लोक मला अमुक एक अमुक रोग झाला आहे असे स्वतःच निदान करून घेऊन मग त्यावर चिंता करून आणखी एखाद्या मानसिक रोगास जन्म देत असतात.त्यापेक्षा डॉक्टरकडे जाऊन निदान करून घेणे आवश्यक असते. डॉक्टरने एकदा “तुम्हाला काहीही झालेले नाही” असे ठणकावून सांगितले की आपण निर्धास्त जगू शकतो.     

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 प्रसाद नातु, पुणे.

image courtesy.wikipedia 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...